शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
4
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
6
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
7
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
8
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
9
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
10
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
11
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
12
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
13
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
14
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
15
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
16
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
17
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
18
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
19
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा

टोलनाका व्यवस्थापनास दिवाळीपर्यंत मुदतवाढ--आनेवाडीत पोलिसांचा फौजफाटा तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 11:04 PM

पाचवड : आनेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापन बदलावरून गुरुवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून उदयनराजे यांनी टोलनाक्यावर तळ ठोकून

ठळक मुद्देशुक्रवारी पहाटेपासून टोलवसुलीस सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : आनेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापन बदलावरून गुरुवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून उदयनराजे यांनी टोलनाक्यावर तळ ठोकून टोलनाका टोल फ्री केलेला होता. दरम्यान, घडलेल्या अनेक घडामोडीनंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास उदयनराजे यांचेच व्यवस्थापन टोलनाक्यावर दिवाळीपर्यंत अबाधित राहणार असल्याची माहिती ईमेलमार्फत मिळाल्यावर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास नाक्यावरील टोलवसुली पूर्ववत सुरू झाली.टोलनाक्यावरील राजेंच्या व्यवस्थापनास दिवाळीपर्यंत मुदतवाढ मिळाल्यानंतर आनेवाडी टोलनाक्यावरील वातावरण रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सुरळीत झाले. गुरुवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून पहाटे दोन वाजेपर्यंत टोल फ्री झालेल्या नाक्यावर त्यानंतर वाहनांच्या टोलवसुलीस सुरुवात झाली.दोन्ही राजेंच्या समर्थकांमध्ये गुरुवारी रात्रभर सुरू असलेल्या वादावादीचे पडसाद टोलनाक्यावर उमटू शकतात, या शक्यतेमुळे टोलनाक्यावर पोलिसांचा मोठाफौज फाटा तैनात ठेवण्यात आला होता. शुक्रवारीटोलनाक्यावर कोणताहीअनुचित प्रकार घडला नाही,मात्र टोलनाक्यावर शुक्रवारीदिवसभर तणावपूर्ण शांतता जाणवत होती.दगडफेकीच्या अफवाटोलनाक्यावर जोरदार दगडफेक झाली असल्याची अफवा पसरली असून, अशा प्रकारचा कोणताही अनुचित प्रकार टोलनाक्यावर घडलेला नाही. टोलनाक्यावर पूर्णपणे शांतता असून, खबरदारीचा उपाय म्हणून योग्य तो पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.