शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

मराठा मोर्चेकºयांना टोल फ्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 11:46 PM

सातारा : मुंबई येथे दि. ९ आॅगस्ट रोजी होत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीचा भाग म्हणून सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी जनजागृती रॅलीच्या नियोजनाला परवानगी मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या सातारा जिल्हा समन्वय समितीने जिल्हा पोलिस प्रमुखांशी चर्चा केली. या चर्चेनंतर सर्वत्र जनजागृती रॅलींना परवानगी देण्याचा निर्णय जिल्हा पोलिस प्रमुख ...

सातारा : मुंबई येथे दि. ९ आॅगस्ट रोजी होत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीचा भाग म्हणून सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी जनजागृती रॅलीच्या नियोजनाला परवानगी मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या सातारा जिल्हा समन्वय समितीने जिल्हा पोलिस प्रमुखांशी चर्चा केली. या चर्चेनंतर सर्वत्र जनजागृती रॅलींना परवानगी देण्याचा निर्णय जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी जाहीर केला. दरम्यान, सुव्यवस्थेचा भाग म्हणून मोर्चात सामील होणाºयांना जाता-येताना टोल फ्री करा, अशा सूचनाही जिल्हा पोलिस प्रमुखांनी टोल व्यवस्थापनाला दिल्या.सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने शुक्रवारी जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याशी मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा केली. मराठा क्रांती मोर्चा हा मूक मोर्चा असल्याने कोणताही हिंसक प्रकार घडणार नाही. त्यामुळे सातारा जिल्ह्यात मोर्चाच्या तयारीचा भाग म्हणून जनजागृती रॅली निघणार आहे. त्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. दहिवडी येथे अशी परवानगी नाकारल्याचे शिष्टमंडळाने संदीप पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. पाटील यांनीही तत्काळ दहिवडी पोलिसांशी संपर्क साधून रॅलीला परवानगी देण्याच्या सूचना केल्या. शिवाय सातारा जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाने यापूर्वी जे शांततेचे सहकार्य केले आहे, ती पार्श्वभूमी लक्षात घेवून सर्वत्र जनजागृती रॅलींना परवानगी देण्याचा निर्णय संदीप पाटील यांनी जाहीर केला.सातारा जिल्ह्यातून सुमारे आठ ते दहा लाख मराठा मोर्चेकरी मुंबईत जाणार असल्याने सातारा जिल्ह्याच्या हद्दीत जे टोलनाके आहेत तिथे वादावादीचे प्रसंग घडू शकतात. त्यातून अनुचित प्रकार होवू नये यासाठी टोल व्यवस्थापनाला जाता व येताना मोर्चेकºयांना टोल फ्री करा, अशा सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. जिल्हा पोलिस प्रमुखांनी संबंधित ठिकाणच्या पोलिस अधिकाºयांशी संपर्क साधून मोर्चेकºयांचा टोल घेतला जाणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन टोल व्यवस्थापनाकडून करावे असे आदेश दिले.साताºयात आज भव्य दुचाकी रॅलीसातारा शहरात शनिवार, दि. ५ रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य मोटरसायकल रॅली निघणार असून, या रॅलीला परवानगी देण्यात आली आहे. शाहू स्टेडियमपासून ते राजवाड्यापर्यंत व पुन्हा शाहू स्टेडियम अशी ही रॅली असून या रॅलीबरोबरच रिक्षा रॅलीही काढली जाणार आहे. या रॅलीत मराठा बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.