सातारा : मुंबई येथे दि. ९ आॅगस्ट रोजी होत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीचा भाग म्हणून सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी जनजागृती रॅलीच्या नियोजनाला परवानगी मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या सातारा जिल्हा समन्वय समितीने जिल्हा पोलिस प्रमुखांशी चर्चा केली. या चर्चेनंतर सर्वत्र जनजागृती रॅलींना परवानगी देण्याचा निर्णय जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी जाहीर केला. दरम्यान, सुव्यवस्थेचा भाग म्हणून मोर्चात सामील होणाºयांना जाता-येताना टोल फ्री करा, अशा सूचनाही जिल्हा पोलिस प्रमुखांनी टोल व्यवस्थापनाला दिल्या.
सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने शुक्रवारी जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याशी मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा केली. मराठा क्रांती मोर्चा हा मूक मोर्चा असल्याने कोणताही हिंसक प्रकार घडणार नाही. त्यामुळे सातारा जिल्ह्यात मोर्चाच्या तयारीचा भाग म्हणून जनजागृती रॅली निघणार आहे. त्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. दहिवडी येथे अशी
परवानगी नाकारल्याचे शिष्टमंडळाने संदीप पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. पाटील यांनीही तत्काळ दहिवडी पोलिसांशी संपर्क साधून रॅलीला परवानगी देण्याच्या सूचना केल्या. शिवाय सातारा जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाने यापूर्वी जे शांततेचे सहकार्य केले आहे, ती पार्श्वभूमी लक्षात घेवून सर्वत्र जनजागृती रॅलींना परवानगी देण्याचा निर्णय संदीप पाटील यांनी जाहीर केला.
सातारा जिल्ह्यातून सुमारे आठ ते दहा लाख मराठा मोर्चेकरी मुंबईत जाणार असल्याने सातारा जिल्ह्याच्या हद्दीत जे टोलनाके आहेत तिथे वादावादीचे प्रसंग घडू शकतात. त्यातून अनुचित प्रकार होवू नये यासाठी टोल व्यवस्थापनाला जाता व येताना मोर्चेकºयांना टोल फ्री करा, अशा सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. जिल्हा पोलिस प्रमुखांनी संबंधित ठिकाणच्या पोलिस अधिकाºयांशी संपर्क साधून मोर्चेकºयांचा टोल घेतला जाणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन टोल व्यवस्थापनाकडून करावे असे आदेश दिले.साताºयात आज भव्य दुचाकी रॅलीसातारा शहरात शनिवार, दि. ५ रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य मोटरसायकल रॅली निघणार असून, या रॅलीला परवानगी देण्यात आली आहे. शाहू स्टेडियमपासून ते राजवाड्यापर्यंत व पुन्हा शाहू स्टेडियम अशी ही रॅली असून या रॅलीबरोबरच रिक्षा रॅलीही काढली जाणार आहे. या रॅलीत मराठा बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.