सातारा : पावसाळा सुरू झाल्यापासून पालेभाज्यांच्या दरात नेहमीत चढ-उतार होत आहे. जी भाजी महाग ती ताटातून गायब असेच चित्र स्वयंपाकघरात पहावयास मिळत होते. काही दिवसांपूर्वी ८० रूपये किलोवर गेलेल्या टोमॅटोचे दर कुठे कमी होतायत न होतायत तोवर कांद्याच्या दरात अचानक वाढ झाल्याने गृहिणींचे बजट पुन्हा एकदा कोलमडले आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस झाला असला तरी पूर्वेकडील माण, खटाव, कोरेगाव, फलटण या तालुक्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. याचा परिणाम फळ व पालेभाज्यांच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादन व आवक कमी झाल्यामुुळे पालेभाज्यांच्या किमतीतही हळूहळू वाढ होऊ लागली आहे.ग्रामीण भागातून मुख्य बाजारपेठेत विक्रीसाठी येणाºया पालेभाज्याचे प्रमाण कमी झाल्याने ग्राहकांचा दरवाढीची झळ सोसावी लागत आहे. पावसाळ्यात बहुतांश पालेभाज्यांचे दर कमी झाले. अगदी ६० ते ८० रुपये किलो या दराने विकल्या जाणाºया फळ व पालेभाज्या २० ते ३० रुपये किलोवर आल्या. एक महिन्यांपूर्वी टोमॅटो १० ते २० रुपये किलो या दराने विकला जात होता. मात्र, आवक कमी झाल्याने टोमॅटोचे दर गगणाला भिडले. तब्बल ८० रुपये किलो या दराने टॉमॅटोची विक्री केली गेली. गेल्या तीन-चार दिवसांपासून हे दर वीस रूपयांनी उतरले असून सध्या बाजारपेठेत ६० रुपये किलो या दराने टोमॅटोची विक्री केली जात आहे. ग्राहकांना याचा थोडा दिलासा मिळत असतानाच दुसरीकडे कांद्याच्या दरात अचानक वाढ झाली आहे. बाजारपेठेत आठ ते दहा रुपये किलो या दराने मिळणारा कांदा सध्या तीस रुपये किलो या दराने विकला जात आहे. पालेभाज्यांच्या दरात सतत चढ-उतार होत असल्याने ग्राहकांना याची काही प्रमाणात झळ बसत आहे. |
टोमॅटो उतरला... कांदा भडकला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 4:28 PM
सातारा : पावसाळा सुरू झाल्यापासून पालेभाज्यांच्या दरात नेहमीत चढ-उतार होत आहे. जी भाजी महाग ती ताटातून गायब असेच चित्र स्वयंपाकघरात पहावयास मिळत होते. काही दिवसांपूर्वी ८० रूपये किलोवर गेलेल्या टोमॅटोचे दर कुठे कमी होतायत न होतायत तोवर कांद्याच्या दरात अचानक वाढ झाल्याने गृहिणींचे बजट पुन्हा एकदा कोलमडले आहे.सातारा जिल्ह्याच्या पश्चिम ...
ठळक मुद्देआवक कमी झाल्याने ग्राहकांना दरवाढीची झळकांदा विक्री सध्या तीस रुपये किलो टोमॅटोची विक्री मात्र ६० रुपये किलो दराने पालेभाज्यांच्या दरात सतत चढ-उतारग्राहकांना याची काही प्रमाणात झळ