शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

लोणंद नगरपंचायतीत घड्याळाचीच टिकटिक !

By admin | Published: May 04, 2016 11:22 PM

कमळही फुलले : अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या स्नेहलता शेळके-पाटील, तर उपाध्यक्षपदी भाजपचे लक्ष्मणराव शेळके

लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी आमदार मकरंद पाटील यांनी सर्वांना एकत्र करून आपल्या जादूची झलक दाखविली. राष्ट्रवादी आणि भाजपच्या गठबंधनाला अपक्षाचीही साथ मिळाली. त्यामुळे अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या स्नेहलता शेळके-पाटील, तर उपाध्यक्षपदी भाजपचे लक्ष्मणराव शेळके यांची बहुमताने निवड करण्यात आली. लोणंदच्या नगराध्यक्ष निवडीसाठी बुधवारी विशेष बैठक बोलावली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून या निवडीवरून मोठी रस्सीखेच सुरू होती. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या स्नेहलता शेळके-पाटील, बंडखोर दीपाली क्षीरसागर तर काँग्रेसकडून स्वाती भंडलकर यांचे अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, राष्ट्रवादीतील नाराज गटाला आपलेसे करण्यात आमदार मकरंद पाटील यांना यश आले. त्यामुळे मतदानावेळी दीपाली क्षीरसागर यांनी स्वत:चे मत स्नेहलता शेळके-पाटील यांच्याच पदरात टाकले. ाष्ट्रवादीत आलबेल झाल्यामुळे ठरल्याप्रमाणे उप-नगराध्यक्षपदी भाजपची वर्णी लागली. आमदार मकरंद पाटील सकाळी अकरा वाजता सर्व नऊ नगरसेवकांना घेऊन कार्यालयात पोहोचले. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील, माजी सभापती रमेश धायगुडे, सभापती नितीन भरगुडे-पाटील, अ‍ॅड. शामराव गाढवे, मनोज पवार होते. तर भाजपचे दोन्ही नगरसेवक, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, विनोद क्षीरसागर यांच्यासोबत एकाच वेळी आले. त्यानंतर काँग्रेसचे सहा नगरसेवक दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी अस्मिता मोरे यांनी काम पाहिले. राष्ट्रवादीला ११, कॉँग्रेसला ६सर्वप्रथम दीपाली क्षीरसागर यांच्यासाठी हात उंचावून मतदान घेतले; मात्र त्यांना एकही मत मिळाले नाही. त्यानंतर स्नेहलता शेळके-पाटील यांना राष्ट्रवादीचे आठ, अपक्ष एक आणि भाजपचे दोन अशी अकरा मते मिळाली. तर काँग्रेसचे स्वाती भंडलकर यांना सहाजणांनी मते दिली. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून लक्ष्मणराव शेळके, काँग्रेसकडून राजेंद्र डोईफोडे यांनी अर्ज दाखल केले. त्यातही अकरा विरुद्धसहा मतांनी शेळके विजयी झाले.आमदार ठाण मांडून !निवडीनंतर राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करत जल्लोष केला. शहरातून मिरवणूक काढली. निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत आमदार मकरंद पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर नगरपंचायत कार्यालयात ठाण मांडून होते.