शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘सह्याद्री’साठी उच्चांकी २२४ अर्ज दाखल

By admin | Published: February 16, 2015 10:18 PM

उंडाळकर समर्थकांचीही एन्ट्री : तिन्ही गटांच्या उमेदवारांच्या उत्साहाला उधाण

कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक १७ मार्चला होत आहे. सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर, सहा गटांत तब्बल २२४ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटाच्या उमेदवारांच्यातही यावेळी उत्साह पाहायला मिळाला. सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासूनच येथील निवडणूक कार्यालयासमोर इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. शहर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पहिले दोन दिवस अर्ज विक्री झाली खरी; पण एकही उमेदवारी अर्ज भरला गेला नाही. तिसऱ्या दिवशी काहीनी अर्ज भरले; मात्र आज शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी केली. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांनी आज दुपारी येथील पी. डी. पाटील प्रतिष्ठानच्या कार्यालयासमोर सभासदांना मार्गदर्शन केले आणि शक्तिप्रदर्शनासह ते दुपारी दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी पोहोचले त्यांच्या अनेक समर्थकांनीही पी. डी. पाटील पॅनेलच्या वतीने अर्ज दाखल केले. त्यानंतर काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांच्यासह त्यांच्या सुमारे ६० समर्थकांनी प्रस्थापितांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले तर ‘स्वाभिमानी’चे मनोज घोरपडे यांच्यासह सुमारे ४८ समर्थकांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले. भरीस भर म्हणून माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या सुमारे १७ समर्थकांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज भरले. त्यात पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलराव जाधव, तांबवेचे माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णा पाटील, मसूरचे वसंतराव जगदाळे आदींचा समावेश आहे. त्यामुळे सुरुवातीस दुरंगी-तिरंगी वाटणारी ही निवडणूक नेमकी कोणत्या वळणावर जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)भाऊ... लक्ष असू द्या !दुपारी दोन वाजता अर्ज भरल्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील निवडणूक कार्यालायातून बाहेर पडले, त्यावेळी नवग्रह मंदिरानजीक त्यांचे कार्यकर्ते उभे होते. त्यातील एकाकडे पाहून आमदार पाटील यांनी हात जोडत ‘भाऊ लक्ष असू द्या,’ अशी हाक दिली. त्यामुळे यंदा निवडणुकीत मतदार सभासदांचा ‘भाव’ वाढल्याची चर्चा उपस्थितांच्यात सुरू झाली.