शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

तब्बल ४५० तंटे निकालात

By admin | Published: July 06, 2014 11:08 PM

बावधनचा इतिहास : ३० वर्षांपूर्वीचीही भांडणे मिटविण्यात समितीला यश

तानाजी कचरे ल्ल बावधनराजकीयदृष्ट्या जागृत व सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या बावधन (ता. वाई) येथे तंटामुक्त समितीने केलेल्या पारदर्शक कारभारामुळे सुमारे तीस वर्षांपूर्वीचे प्रलंबित व किचकट तंट्यासह शेकडो तंट्यांचे निवारण करण्यात समितीला यश आले आहे. १४८ महसुली, ९० दिवाणी तर २२४ फौजदारी असे तब्बल ४६२ तंटे मिटवून गावाने नवा इतिहास रचला आहे.पोलीस यंत्रणा व न्याय व्यवस्थेवरील वाढलेला ताण लक्षात घेता शासनाने राबविलेल्या महत्त्वकांक्षी तंटामुक्त अभियानाला वाई तालुक्यातही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. बावधनसारख्या राजकीयदृष्ट्या जागृत गावात हा या अभियानाचा श्री गणेशा झाला; पण मोठ्या लोकसंख्येच्या गावात अभियान यशस्वी होईल का? याबाबत शंका उपस्थित झाल्या. एकट्या बावधनची १६ हजार लोकसंख्या तर आसपासच्या बारा वाड्यांची काही हजारात, त्यामुळे ऐकेकाळी तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या बावधनकरांनी बोलू ते करू, हे चित्र पाहावयाला मिळाले. मोठ्या संख्येच्या गावात स्वभाविकपणे तंटेही लक्षणीय होते. यामुळे दिवसाआड कोर्ट-कचेरी ठरलेली अनेकवेळा वाढत्या तंट्याने गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता.या पार्श्वभूमीवर २००७ मध्ये तंटामुक्त अभियान उदयाला आले अन् गावाची परिस्थितीच बदलून गेली. गेल्या सात वर्षांपासून गावात तंटामुक्त समितीचे काम प्रामाणिकपणे सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत तर समितीने एक पाऊल पुढे टाकले आहे. २० ते ३० वर्षांत जे न्यायालयात घडले नाही ते समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून घडले आहे. जे तंटे मिटूच शकत नाहीत, असे शेकडो महसूल, बांधकाम, दिवाणी व फौजदारी तंटे आपआपसात तडजोडी करून मिटवले आहेत. केवळ बावधन गावातील नव्हे तर आजूबाजूंच्या वाड्यांचे तंटेही या समितीने सहजरीत्या मिटविले आहेत.योग्य मार्गदर्शन, युक्तिवाद व दोन्हीकडील लोकांना पटवून सांगायचे कौशल्य, यामुळे १४८ महसुली, ९० दिवाणी तर २२४ हून अधिक फौजदारी तंटे निकाली काढण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनानेही समितीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील मोठ्या गावांनी आदर्श घ्यावा असे काम बावधनच्या तंटामुक्त समितीने केले आहे.