शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
3
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
4
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
5
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
6
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
7
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
8
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
9
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
10
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
11
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
12
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
13
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
14
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
15
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
17
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
18
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
19
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
20
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'

पर्यटकांचा ओघ वाढला

By admin | Published: December 24, 2014 11:29 PM

शिवाजी संग्रहालयाला मिळेना मुहूर्त

सचिन काकडे - सातारा  -तसे पाहिले तर पर्यटनाच्या दृष्टीने सातारा जिल्ह्याला मोठा नावलौकिक प्राप्त झाला आहे. आज जिल्ह्यातील पर्यटनस्थळे जगाच्या नकाशावर झळकत आहे. मात्र, काही निवडक पर्यटनस्थळांबरोेबरच अपरिचित पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत चालली असून, ही नव्या आर्थिक विकासाची व स्थानिकांच्या उत्पन्नवाढीची नांदीच ठरली आहे.पर्यटनस्थळ म्हटलं की, महाबळेश्वर, पाचगणी, ठोसेघर, कास अशी अनेक नावे सर्वप्रथम समोर येतात. मात्र, या पर्यटनस्थळांबरोबच आता कोयना अभयारण्य, चाफळ, आगाशिवनगर, पाटेश्वर, नागेश्वर, वासोटा, बामणोली अशा अनेक प्रसिद्धीपासून अलिप्त राहिलेल्या पर्यटनस्थळांना पर्यटक भेटी देत असून पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटत आहेत. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सेवा-सुविधा नसल्याने स्थानिक नागरिक व पर्यटनच्या दृष्टीने या स्थळांचा कसलाच फायदा होत नाही. त्यामुळे ही पर्यटनस्थळे विकसित करणे अत्यंत गरजेचे आहे. महाबळेश्वर, पाचगणीसारख्या शहरांचे सिने अभिनेत्यांकडून बॅँ्रडिंग केले जात असताना दुसरीककडे मात्र अनेक पर्यटनस्थळे प्रसिद्धीबरोबरच विकासापासूनही वंचित आहेत. मात्र हीच पर्यटनस्थळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. पर्यटनाबरोबच तीर्थाटनाला येणाऱ्या पर्यटकांचा आलेखही दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जिल्ह्यातील पाली, पुसेगाव, मांढरदेव, सज्जनगड, औंध अशा अनेक ठिकाणी पर्यटक तीर्थाटनाला येत आहेत. पर्यटनाबरोबच तीर्थाटनाला महत्त्व प्राप्त होत असल्याने पर्यटनस्थळांबरोबच जिल्ह्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास होणे गरजेचे आहे. औद्योगिक विकासात थोडा मागे राहिलेला जिल्हा पर्यटनातून अनेकांना उत्पन्न मिळवून देऊ लागला असून, केवळ सुसूत्रता आणि नियोजनाची गरज असल्याचे २०१४ मध्ये भेट देणाऱ्या पर्यटकांचे मत पडले. पाहायला येणारा पर्यटक राहायला आला, तरच पर्यटनातून उत्पन्न, रोजगार मिळणार आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना येथे असणारे गड, किल्ले नेहमीच भुरळ घालतात. मात्र काही ठराविक किल्ले वगळता अन्य किल्यांची दुरवस्थाच पर्यटकांच्या दृष्टिक्षेपास पडले. त्यामुळे पर्यटनाला चालना देणाऱ्या या गड, किल्यांकडे पर्यटक आजही पाठ फिरविताना दिसातात. त्यामुळे पर्यटनासाठी गड, किल्ल्यांचे संवर्धन करणेही तितकेच गरजेचे आहे.शिवाजी संग्रहालयाला मिळेना मुहूर्तछत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या सातारा शहरात शिवकालीन वस्तूंचे जतन करण्यासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्चून ‘शिवाजी संग्रहालय’ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, गेली तीन-चार वर्षांपासून हे काम संथगतीने सुरू आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या वस्तुसंग्रहालयाचा महत्त्व प्राप्त झाले असताना हे काम केव्हा पूर्णत्वास जाईल, हे मात्र निश्चित सांगता येत नाही. शासनाच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सुरू उमटू लागले आहेत. त्यामुळे सातारा शहराच्या पर्यटनवाढीसाठी शिवाजी वस्तुसंग्रहालयाचे काम वेगाने पूर्ण करणे गरजेचे आहे.महाबळेश्वर पालिकेने पर्यटनवाढीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलून यावर्षी एका सिनेअभिनेत्याला महाबळेश्वरचे बॅँ्रड अ‍ॅँबॅसेडर केले. परिणामी महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. तसेच बारमाही पर्यटन सुरु झाले.