सातारा : राज्य शासनानेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देता येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे व्यापाऱ्यांची बैठक निष्फळच ठरली. तर सध्या सणांचे दिवस असल्याने माल भरला आहे. कंपन्यांना पैसे द्यायचे आहेत. त्यामुळे यावर तोडगा निघावा, अशीच अपेक्षा व्यापाऱ्यांची असून याबाबत त्यांनी निवेदनही दिले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत खासदार उदयनराजे भोसले आणि सातारा शहरातील व्यापाऱ्यांची बैठक झाली. कोरोनामुळे राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. याला सातारा शहरासह जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी दुपारी जवळपास पाऊण तास बैठक झाली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अत्यावश्यक सेवेच्या वेळेप्रमाणेचे इतर आस्थापनाही सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. शहरातील सर्व व्यापारी कोरोनाचे नियम पाळतील असेही सांगितले. पण, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करता येणार नाहीत. राज्याचा निर्णय असल्याने मलाही तो मागे घेता येणार नसल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी तुमच्या भावना योग्य आहेत. याबाबत राज्यस्तरावर त्या कळवू, असे सांगून व्यापारीवर्गाला आश्वस्तही केले.आम्ही प्रशासनाबरोबर...याबाबत व्यापारी प्रतिनिधींशी संपर्क साधल्यावर त्यांनीही आपल्या भावना मांडल्या. सध्या सणाचे दिवस आहेत. लाखो रुपयांचा माल भरला आहे. त्यामुळे अर्थचक्र सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्याबाबत निवेदन दिले. पण, त्यांनी राज्याचा निर्णय असल्याचे सांगून तुमच्या भावना वरपर्यंत कळवू असे सांगितले. त्यामुळे आम्हाला आता योग्य निर्णयाची अपेक्षा आहे. तसेच याबाबत आम्ही प्रशासनाबरोबरच आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.लॉकडाऊन विरोध अन् फॅमिली प्लॅनिंग...बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले हे पत्रकारांशी बोलले. यावेळी त्यांनी सध्या सणासुदीचे दिवस आहेत. व्यापाऱ्यांनी दुकानात माल भरला आहे. कामगारांचा पगार कसा द्यायचा हा प्रश्न आहे. यावर लॉकडाऊन हा पर्याय नाही. कारण, मी पहिल्यापासूनच लॉकडाऊनच्या विरोधात आहे, असे स्पष्टपणे सांगितले. त्याचबरोबर कोरोना लसीच्या तुटवड्याबद्दल पत्रकारांनी खासदार उदयनराजेंना बोलते केल्यावर त्यांनी ह्यमहाराष्ट्राला जादा लस मिळावी आणि इतरांना कमी असे व्हायला नको. कारण, प्रत्येक राज्याला लोकसंख्येच्या प्रमाणात कोरोना लस मिळावी. देशाची लोकसंख्या बघा. प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केले असते तर ही परिस्थिती उद्भवली असती का? असा प्रश्नही उपस्थित केला.
प्रशासनासोबतच्या बैठकीनंतरही व्यापाऱ्यांना परवानगी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 11:16 AM
corona virus Collcator Satara-राज्य शासनानेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देता येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे व्यापाऱ्यांची बैठक निष्फळच ठरली. तर सध्या सणांचे दिवस असल्याने माल भरला आहे. कंपन्यांना पैसे द्यायचे आहेत. त्यामुळे यावर तोडगा निघावा, अशीच अपेक्षा व्यापाऱ्यांची असून याबाबत त्यांनी निवेदनही दिले.
ठळक मुद्देप्रशासनासोबतच्या बैठकीनंतरही व्यापाऱ्यांना परवानगी नाही बैठक निष्फळ : दुकाने सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन