पिंपोडे बुद्रुक : सध्याच्या बाजारपेठेतील सोयाबीनचा पडता दर लक्षात घेता शेतकºयांचे नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा, या हेतूने कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा जास्तीत जास्त शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन खरेदी-विक्री संघाच्या वतीने अध्यक्ष शहाजी भोईटे व उपाध्यक्ष प्रल्हादराव माने यांनी केले आहे.
शेतकºयाच्या मालाला केंद्र शासनाने निर्धारित केलेली किमान आधारभूत किंमत मिळावी, या हेतूने कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ, शेती उत्पन्न बाजार समिती व मार्केटिंग फेडरेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने नाफेडच्या मंजुरीने खरीप हंगाम २०१८-१९ करिता बाजार समिती कोरेगाव येथील मुख्य बाजार आवारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले आहे.
हे केंद्र १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव भोईटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वखार महामंडळ कोरेगाव साठा अधीक्षक जाधव, सहायक निबंधक सुद्र्रीक, खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले, कोरेगाव बाजार समितीचे सहायक सचिव संभाजीराव निकम, संचालक उपस्थित होते.
बाजारात सोयाबीन मालाची ज्यादा आवक झाल्याने बाजार भाव किमान आधरभूत किमतीपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात असताना अशा प्रकारे शेतकºयांची गळचेपी होऊन आर्थिक नुकसान होऊ नये, या हेतूने हे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी केंद्र शासनाने ठरविलेल्या किमान आधारभूत किमतीने म्हणजेच प्रति क्विंटल ३ हजार ३९९ रुपये दराने सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे, त्यासाठी शेतकºयांनी खरेदी केंद्र्रावर आॅनलाईन नोंदणीकरिता २०१८-१९ चे सोयाबीन या पीक पाण्याच्या नोंदीसह ७/१२ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुकची प्रत घेऊन येणे अनिवार्य केले आहे.शेतकºयांनी खरेदी केंद्रावर आणलेला माल स्वच्छ असावा, मालाची आर्द्रता कमाल बारा टक्के असावी, तो मातीमिश्रीत नसावा, असे आवाहन संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले यांनी केले आहे.गतवर्षी आठ हजार क्विंटल साठाकोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतवर्षीही सोयाबीन खरेदी-विक्री संघाच्या वतीने खरीप हंगामात आठ हजार एकशे साठ क्विंटल सोयाबीन तसेच रब्बी हंगामात हरभरा खरेदी करण्यात आला होता. त्याचप्रमाणे यंदाही करण्यात येणार आहे. याचा फायदा तालुक्यातील शेतकºयांना होणार आहे.
एकीकडे वाढत्या भांडवली खर्चाच्या तुलनेत बाजारभावामध्ये होणारी दराची घसरण लक्षात घेता शेतकºयांना आपल्या मालाला किफायतशीर बाजारभाव मिळणे आवश्यक आहे. त्यांना योग्य दर मिळावा, या उद्देशाने कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे हे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. जास्तीत जास्त शेतकºयांनी त्याचा फायदा घ्यावा.- शहाजी भोईटे, चेअरमन, कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघ