प्रगती जाधव-पाटील ।सातारा : भ्रष्टाचारमुक्त बदली प्रक्रिया व्हावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या आॅनलाईन बदलीचा घोळ वाढतच चालला आहे. शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या बदलीच्या कागदावर प्रशासनाचा लोगो आणि अधिकाऱ्याची स्वाक्षरी नसल्याचे दिसते. त्यामुळे या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप झाल्याचा आरोप आता शिक्षक करू लागले आहेत.
जिल्ह्यातील शिक्षकांना जिल्हा परिषदेने शनिवारी बदलीच्या ठिकाणच्या आॅर्डर दिल्या. आॅनलाईन प्रक्रियेतील जवळपास सर्वच कागदांवर ‘याला स्वाक्षरीची आवश्यकता नाही’ अशी सूचना लिहिले जाते. शिक्षकांच्या या बदलीच्या आदेशावर शासनाचा लोगो आणि स्वाक्षरी तर नाहीच; पण त्याविषयीच्या सूचेनचाही उल्लेख नाही. बदली प्रक्रियेतील बोगस आदेशावर कोणत्याही शासकीय विभागाचा लोगो नसणे वेबसाईटचा उल्लेख नसणे सर्व आदेश पीडीएफमध्ये असल्याने त्यात छेडछाड करून घोटाळा केल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.
शासनाच्या नियमानुसार ज्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत, त्या सर्व शाळा दुर्गम धरल्यामुळे अनेक शिक्षक बदली प्रक्रियेतून वाचले. समानीकरणातील घोटाळा समानीकरणाच्या शाळांवर उपशिक्षक पदवीधर आणि मुख्याध्यापक हजर झाले आहेत, त्यामुळे त्यांच्यातील कोणाला डावलायचे अन् कोणाला हजर करून घ्यायचे? हे स्पष्ट झाले नसल्यामुळे गोंधळ अधिक वाढला आहे.
पती-पत्नी एकत्रीकरणासाठी ३० किलोमीटरचे अंतर न तपासता बदल्या केल्या गेल्याचा आक्षेपही शिक्षकांनी नोंदविला आहे. हे अंतर रस्त्याने जवळचे अपेक्षित असताना एसटीचे अंतर ग्राह्य धरून फसवणूक करून ही बदली करून घेतली आहे. अनेक ठिकाणी सेवाज्येष्ठता डावलल्यामुळे ज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय झाला. कित्येक पती-पत्नीच्या जिल्ह्यातील नोकरीची खातरजमा न करता खासगी कंपनीच्या नोकºया ग्राह्य धरून बदली केली. संवर्ग १-३ यांची बदली झाल्यानंतर राहिलेल्या पदांची घोषणा न करता संवर्ग ४ ला फॉर्म भरण्याने गोंधळात भर पडली आहे.
बोगस प्रमाणपत्रांबाबत आक्षेपशिक्षकांच्या बदलीसाठी संवर्ग १ मध्ये गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र जिल्हा शासकीय रुग्णालयातून आवश्यक असते. तर संवर्ग २ मध्ये पती-पत्नी एकत्रीकरणासाठी दोघांचे कामाचे ठिकाण ३० किलोमीटर बाहेरील असल्याचे प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र सादर करताना काही शिक्षकांनी सामान्य आजारांची टक्केवारी गंभीर दाखवल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. काहींनी तर एसटी प्रशासनाकडून अंतर वाढवून घेऊन त्याचे प्रमाणपत्र सादर केले. या प्रमाणपत्रांसाठी मोठी संबंधित शिक्षकांनी मोठी रक्कम मोजल्याची चर्चा शिक्षकांच्या वर्तुळात आहे.
बदलीतील त्रुटी अशासंवर्ग १ मधील अपंगांची शारीरिक तपासणी न करता अपंगांचे दाखले ग्राह्य धरले३० किलोमीटरच्या बाहेरील शिक्षकांनी मागितलेल्या शाळा पुन्हा ३० किलोमीटरच्या बाहेरच्या आहेत की नाही, याची खातरजमा न करता सोयीच्या शाळा दिल्याविषय शिक्षकांच्या बदलीत घोटाळा एकाच विषयांचे २ शिक्षक एकाच शाळेवर बदलीने हजरविस्थापित शिक्षकांची सविस्तर यादी घोषित न करणेबदली पात्र नसलेल्या शिक्षकांच्या बदल्या करणे