शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

कऱ्हाडच्या ‘सैराट’ मुख्याधिकाऱ्यांची बदली करा

By admin | Published: June 12, 2017 11:38 PM

कऱ्हाडच्या ‘सैराट’ मुख्याधिकाऱ्यांची बदली करा

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : कर्मचाऱ्यांवर दबाव टाकणे, उर्मट भाषा वापरत नगराध्यक्षांचा अवमान करणे, नगरपालिका निवडणूक काळात आर्थिक व्यवहारांसह पालिकेला शासनाकडून मिळालेल्या निधीबाबतची बँकेतील खात्यांमध्ये गैरव्यवहार करणारे मुख्याधिकारी सैराट झाले आहेत. त्यांनी दीड वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्याची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची चौकशी समिती नेमावी, असे सांगत नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी करीत मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यानङ्खत्यांच्यावर फौजदारीचा गुन्हा दाखल करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.नगराध्यक्षांचा अवमान केल्याप्रकरणी व कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देणाऱ्या मुख्याधिकारी यांच्या कार्यपद्धती व वर्तणूकीबाबत मंगळवारपासून ३ कर्मचारी बेमुदत उपोषणास बसले असून सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यावर विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी मंगळवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्ंयक्षा रोहिणी शिंंदे होत्या. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते.सभेच्या प्रारंभीच नगराध्यक्षा शिंंदे यांनी मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या उर्मट वर्तनाबाबत सभेस माहिती दिली. आवाज चढवून बोलणे, कर्मचाऱ्यांवर दबाव टाकणे असे वर्तन मुख्याधिकारी यांनी केले असल्याचे नगराध्यक्षा शिंदे यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षांशी उर्मट वर्तन करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची काम करण्याची पात्रता नाही. पालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात असे कधीच घडलेले नाही. त्यामुळे असे वागणाऱ्या तसेच पालिकेचा आर्थिक तोटा करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील केली.सभेत माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, नगरसेवक हणमंत पवार, सौरभ पाटील, विजय वाटेगावकर, विनायक पावसकर यांनी मुख्याधिकारी यांनी केलेल्या भ्रष्टाचार व मनमानी कारभाराबाबत माहिती दिली. तर पालिकेतील उपोषणास बसलेल्या व इतर कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी यांनी त्यांच्यासोबत केलेल्या वर्तनाबाबतचा तक्रारीचा सभागृहास पाढाचा वाचला.यावेळी राजेंद्र यादव म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून कऱ्हाड नगरपालिकेत सावळा गोंधळ सुरु आहे. मुख्याधिकारी सैराट झाल्याप्रमाणे काम करीत आहेत. केवळ स्वत:चे ङ्कमहत्व आणि टक्का वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. शासनाकडून आलेला निधी पंजाब नॅशनल बँकेत साडे सात टक्के व्याज दराने ठेवला असताना तो पैसा काढून एचडीएफसी आणि कोटक महिंंद्रा बँकेतील चालू खात्यामध्ये शून्य टक्के व्याजदराने ठेवण्यात आला. त्यामुळे पालिकेचे २४ लाख ९० हजार रुपयांचे झालेले नुकसान मुख्याधिकाऱ्यांकडून वसूल केले पाहिजे. सौरभ पाटील म्हणाले, नगराध्यक्षांबाबत मुख्याधिकाऱ्यांचे वर्तन निषेधार्ह आहे. मुख्याधिकाऱ्यांनी नेहमीच आपल्या कामाची जबाबदारी कनिष्ठ अधिकाऱ्यांवर ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे. विनायक पावसकर म्हणाले, मुख्याधिकाऱ्यांनी पहिल्या दिवसांपासूना शहराच्या हिताविरोधात कामङ्ककेले आहे. एकाचवेळी ११० कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्यांनी केल्या आहेत. आपण म्हणू तोच कायदा अशी भुमिका ठेवत कर्मचाऱ्यांना मानसिक व शारिरीक त्रास मुख्याधिकारी यांनी दिला आहे. पालिकेच्या दीडशे वर्षांच्या इतिहासात प्रथमच कर्मचाऱ्यांवर तीनवेळा संपावर जाण्याची वेळ आली आहे. ङ्कमुुख्याधिकाऱ्यांनी १७ लाखांची कर थकबाकीची ङ्खफाईल गहाळ केली आहे. सीसीटीव्ही भाडे, एलईडी टीव्ही, सर्वर खरेदी आदिंच्या माध्यमांतून त्यांनी लाखो रूपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे.विजय वाटेगावकर म्हणाले, मुख्याधिकारी यांनी दिलेल्या बोगस जन्मतारीख दाखल्याची चौकशी झाली पाहिजे. जलशुद्धीकरण केंद्राकडे अशुद्ध पाणी निवळणेकामी पीएसी पावडर वापरा संदर्भात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन पावडर वापरण्यात येते. मात्र, याबाबत कोणतीही कार्यवाही न करता पीएसी पावडकर मागवून त्याचे बिल अदा करणे पर्यंतची तयारी मुख्याधिकाऱ्यांनी केल्याचे दिसून येते.पालिकेतील कर्मचाऱ्यांनीही मुख्याधिकारी औंधकर यांनी वेळोवेळी दिलेल्या तक्रारीबाबत सभागृहात येऊन म्हणणे सादर केले. मुख्याधिकाऱ्यांनी निवडणूक कालावधीत कर्मचाऱ्यांच्या हातातील जेवणाचे ताट हिसकावून घेतले आणि त्यांना हॉटेलमध्ये जेवन करायला लावले, अशा उर्मट मुख्याधिकाऱ्यांचा कोणत्या प्रकारे आदर करायचा असा सवालही यावेळी कर्मचाऱ्यांनी सभागृहात उपस्थित केला.पालिकेत हिटलरप्रमाणे वर्तनकऱ्हाडचे मुख्याधिकारी म्हणून वावरत असताना विनायक औंधकर यांनी दीड वर्षाच्या कालावधीत अधिकाऱ्यांशी हिटलरप्रमाणे वर्तन केलेले आहे. त्यांनी अधिकाराचा वापर करीत कर्मचाऱ्यांना अनेकवेळा वेठीस धरले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिल्यास त्यांना दमबाजी करणे, कामावरून कमी करण्याची धमकी देणे अशा प्रकारचे कृत्य या मुख्याधिकारी यांनी केले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी केलेलेजळी-स्थळी आता औंधकर दिसतायतमुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी कर्मचाऱ्यांना इतका त्रास दिला आहे हे सांगण्यासाठी सभागृहात प्रत्येक्ष कर्मचाऱ्यांनी येऊन त्यांची माहिती दिली. सभा सुरू असताना एक कर्मचारी म्हणाला की, रात्री अंथरूणात झोपेतही कुणी दिसत असेल तर ते औंधकर दिसत आहेत. काहीजण तर झोपेतही औंधकर म्हणून चावळू लागले आहेत. वर्तन हे हिटलरप्रमाणे आहे. त्यांनी कऱ्हाडचे वाटोळे केले आहेत. त्यांनी जणू कऱ्हाडचे व पालिकेचे वाटोळे करण्याचा ठेकाच घेतला असल्याची टिका यावेळी ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी केली.