शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

Crime News: काजूच्या टरफलांच्या गोण्या खालून मद्याची वाहतूक, ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 12:34 PM

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून गोव्याहून राजस्थानला गोवा बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क व भरारी पथकाला मिळाली होती.

कऱ्हाड : ट्रकमध्ये काजूच्या टरफलांच्या गोण्या रचून त्याखालून दारूच्या तब्बल ३६ हजार बाटल्यांची वाहतूक करणाऱ्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. उत्पादन शुल्कच्या सातारच्या भरारी पथकाने रविवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. आरोपींकडून ५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.मुकेश मोहनलाल सिसोदिया (वय ३९, रा. खजुरिया, ता. हातोड, जि. इंदोर, मध्य प्रदेश) व जितेंद्र भगतसिंग राठोड (वय ३६, रा. मेथवाडा, ता. डेपालपूर, जि. इंदोर, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.उत्पादन शुल्कच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून गोव्याहून राजस्थानला गोवा बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क व भरारी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क व भरारी पथकाने संबंधित ट्रकचा पाठलाग करुन खोडद गावच्या हद्दीत तो ट्रक अडवला.संबंधित ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये विदेशी दारूचे ७५० बॉक्स व दारूचे बॉक्स लपवण्यासाठी वापरलेल्या काजूच्या टरपलांच्या ४७ गोणी आढळून आल्या. दारुचे बॉक्स, टरपालांची गोणी आणि ट्रकसह ५३ लाख २९ हजार २७५ रुपयांचा मुद्देमाल उत्पादन शुल्कने आरोपींकडून जप्त केला आहे. तसेच मुकेश सिसोदिया व जितेंद्र राठोड यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.प्रभारी निरीक्षक एन. पी. क्षीरसागर, निरीक्षक संजय साळवी, दुय्यम निरीक्षक किरण बिरादार, रोहित माने, महेश मोहिते, नितीन जाधव, सचिन खाडे, संतोष निकम, अजित रसाळ, जीवन शिर्के, किरण जंगम, भीमराव माळी, विनोद बनसोडे, राणी काळोखे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी