शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

मृत पिसोरीची वाहतूक; चौघांना अटक

By admin | Published: December 04, 2015 10:14 PM

महाबळेश्वरात कारवाई : अपघात की शिकार? वनविभागाचा तपास सुरू

महाबळेश्वर : हरणासारखा दिसणारा पिसोरी हा मृतावस्थेतील वन्यप्राणी आपल्या वाहनातून घेऊन निघालेल्या तापोळा भागातील तीन शेतकरी व एक शिक्षक अशा चारजणांना महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल एस. डी. कुलकर्णी यांनी अटक केली असून, त्यांच्यावर वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, रात्री पावणे आठ वाजता वन विभागाच्या कार्यालयात एक निनावी फोन आला होता. या फोनवरून मिळालेल्या माहितीवरून वनक्षेत्रपाल एस. डी. कुलकर्णी यांनी तातडीने पोलीस फौजफाटा मागविला. पोलीस व आपले वनकर्मचारी घेऊन सर्वजण तापोळ्याकडे निघाले असता मिळालेल्या माहितीनुसार एक चारचाकी गाडी आली, ती गाडी अडवून तपासणी केली असता, या गाडीत चालकासह चौघेजण होते. या गाडीतील डिकीमध्ये पिसोरी जातीचा वन्यप्राणी मृतावस्थेत आढळून आला. या वन्यप्राण्यास एका प्लास्टिकच्या गोणीमध्ये ठेवण्यात आले होते व त्यावर सामान ठेवले होते. वनविभागाने त्या चौघांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वनक्षेत्रपालांनी चौघांना गुरुवारी रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नितीन सीताराम भोसले (वय २८), किसन विठ्ठल भोसले (४५, दोघेही रा. तेटली, ता. जावळी), भाऊ रामचंद्र भोसले (५१, रा. मुनावळे, ता. जावळी) व संदीप जावजी सावंत (३२, रा. आकल्पे, ता. महाबळेश्वर) यांचा समावेश आहे.वन्यजीव संरक्षक अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ च्या तरतुदीनुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिसोरी हा प्राणी हरणापेक्षाही दुर्मिळ असल्याने वाघ, सिंह या प्रमाणेच या प्राण्याचे कायदे कडक आहेत. त्यामुळे या प्राण्याची शिकार केली होती का, या प्राण्याची शिकार करून तस्करी केली जात होती की, या प्राण्याचे मटण खाण्यासाठी याची शिकार केली होती? याबाबत वनविभागाचे अधिकारी तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)शिकार केली नाही...!अटक करण्यात आलेल्या संशयितांचे नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार ‘या चौघांनी या प्राण्याची शिकार केली नव्हती. अज्ञात वाहनांच्या धडकेत हा प्राणी ठार झाला होता. मात्र, ठार झालेला प्राणी घेऊन जाताना चौघेही वनविभागाच्या जाळ्यात अडकले. दरम्यान, मृत वन्य प्राण्याची वाहतूक प्रकरणाची माहिती मिळताच सहायक वनसरंक्षक महादेव मोहिते यांनी तत्काळ महाबळेश्वरला भेट दिली. मृत प्राण्याची पाहणी केली. पुढील तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या. पिसोरी प्राण्याचा मृत्यू कशामुळे झाला, हे कळण्यासाठी मृत पिसोरीचे शवचिकित्सा करण्यात आल्याचेही वनविभागाने सांगितले.