सातारा : सातारा शहरातून क्षेत्र माहुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे. संबंधितांनी रस्त्याची दुरवस्था थांबवावी, अशी मागणी होत आहे. कृष्णानगर येथील कालव्यापासून कृष्णा नदीच्या पुढील काही अंतरापर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. रात्रीच्या वेळी तर वाहने या खड्ड्यात आदळत असतात. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संबंधितांनी डांबराने खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
.................................................
कोरोनामुळे आठवडी बाजार बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. मागील दोन महिन्यांपासून कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक तालुक्यातील आठवडी बाजार बंद आहेत. माण तालुक्यातीलही बाजार बंद आहेत.
...........................................
समर्थ मंदिर चौकात कोंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातील समर्थ मंदिर चौकात सकाळी व सायंकाळच्या सुमारास वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनधारकांबरोबरच नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
सातारा नगरपालिका-बोगदा मार्गावर समर्थ मंदिर चौक आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र, या चौकात अरुंद रस्ता आहे. तसेच एसटी थांबाही आहे. काही वाहनेही पार्क करण्यात येतात. त्यामुळे सकाळी १० आणि सायंकाळी सहाच्या सुमारास या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे वाहनधारकांचा बराच वेळ जातो. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
.........................................