वाई : ‘मानवी हस्तक्षेपाचा अतिरेक झाल्याने पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झाले आहे. यांचे अनेक दुष्परिणाम दिसत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन शाहीर व आदर्श शिक्षक शरद यादव यांनी केले.
वाई शेजारील नागेवाडीच्या डोंगरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुशांत निकम म्हणाले, ‘भरमसाठ वृक्षतोडमुळे पर्यावरणाचे संतुलित चक्र तुटले आहे. ऑक्सिजनची निर्मिती करणारे वृक्षाचे महत्त्व कोरोना काळात माणसाला कळले आहे.’ कार्यक्रमाचे शासनाचे नियम पाळून वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. यावेळी पिंपळ, वड, चिंच, आवळा सीताफळ आदी पन्नास रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मयूर ननावरे, प्रवीण ननावरे, नीलेश साळुंखे, रामभाऊ राजपुरे आदी कर्मचारी उपस्थित होते.