वाई : ‘मानवी हस्तक्षेपाचा अतिरेक झाल्याने पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झाले आहे. याचे अनेक दुष्परिणाम दिसत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन आदर्श शिक्षक शरद यादव यांनी केले.
वाईशेजारील नागेवाडीच्या डोंगरात वृक्षारोपणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाचे बावधन विभागाचे अधिकारी सुशांत निकम म्हणाले, ‘भरमसाठ वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे संतुलित चक्र तुटले आहे. ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या वृक्षाचे महत्त्व कोरोना काळात माणसाला कळले आहे. या कार्यक्रमात शासनाचे नियम पाळून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रोपण करण्यात आलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेण्यात आली. पिंपळ, वड, चिंच, आवळा, सीताफळ आदी ५० रोपांचे रोपण करण्यात आले. यावेळी मयूर ननावरे, प्रवीण ननावरे, नीलेश साळुंखे, रामभाऊ राजपुरे, आदी कर्मचारी उपस्थित होते.