खंडाळा : ‘पर्यावरण संवर्धन हीच नैसर्गिक संपत्तीचा मार्ग आहे. त्यासाठी वृक्षारोपण ही गरज ओळखून खंडाळ्यातील खंबाटकी घाट परिसरात विविध प्रकारच्या शेकडो वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली.
नगरपंचायत खंडाळा, बार्टी सामाजिक न्याय विभाग यांच्या माध्यमातून हरेश्वर संवर्धन संघटना व ग्रामस्वराज्य युवा सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने खंबाटकी घाट व गायरान क्षेत्रात चारशे विविध प्रकारची ऑक्सिजन देणारी झाडे, फळझाडे, फुलझाडे, वनौषधी यांची रोपे महिलांच्या हस्ते करण्यात आली.
या मोहिमेंतर्गत शंभर महिलांनी स्मृती वनास भेट देऊन श्रमदानातून वटवृक्षाचे रोपण केले. यामध्ये नगरपंचायत महिला कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन सर्वाधिक झाडे लावली. वृक्षारोपण मोहिमेकरिता खंडाळामधील वनिता शिर्के, सुप्रिया ननावरे, सुलक्षणा गोरे, खंडागळे वैशाली शिर्के यांच्यासह आशासेविका, आरोग्यसेविका, प्रादेशिक वनीकरण अधिकारी हर्षा जगताप, बार्टी सामाजिक न्याय विभाग सातारा कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी, हरेश्वर संवर्धनचे गणेश गाढवे, तानाजी गाढवे, गौरव लांडगे, गणेश गजफोडे, मयूर पटेल, चेतन पटेल, अक्षय चव्हाण, सोमनाथ ननावरे, कुणाल गाढवे, संतोष देशमुख, संदीप ननावरे, मयूर शिर्के उपस्थित होते.