प्रगती जाधव-पाटीलजागतिक वारसास्थळ म्हणून कोंदण लाभलेल्या कास पठारावर पर्यटकांची पावसाळ्यातच गर्दी असायची. हा ट्रेंड गेल्या काही वर्षांत बदलत चालला आहे. कास पठाराबरोबरच कास तलावाच्या भोवती असलेल्या धनदाट झाडांच्या संगतीने सुट्यांच्या निमित्ताने पार्टी रंगत आहेत. विशेष म्हणजे मोठ्या शहरांतून येणाऱ्या पाहुण्यांना चुलीवरचं जेवण करून घालण्याकडे सातारकरांचा कल वाढत आहे. त्यामुळेच कासच्या तिरी... कालवण अन् भाकरीची रंगलेली पार्टी अनेकांना मोहात पाडते.
घरी आलेल्या पाहुण्याला खाता-पिता पाठवायचं नाही ही सातारी पाहुणचाराची खासियत. शहरात कितीही आधुनिकता आणि यांत्रिकीकरण आले असले तरीही सातारकरांच्या मनात हा पारंपरिकतेचा पगडा अद्यापही घरोघरी पाहायला आणि अनुभवायला मिळतो. पाहुण्याचं आगमन कोणत्या वेळेवर होतेय, यावर त्यांचा पाहुणचार कसा करायचा? हे ठरतं. सकाळी नऊ आणि सायंकाळी पाचच्या सुमारास येणाºया पाहुण्याचा नाष्टा सक्तीचा! तर जेवणाच्या वेळेत आलेल्याला जेवल्याशिवाय पाठवायचे नाही हे अगदी पक्के ठरलेलेच! एखादा पाहुणा मुक्कामी आला तर दुसºयादिवशी निसर्ग भोजन हमखास होणार. शहरापासून अवघ्या २६ किलोमीटरवर असलेल्या कास तलावाला सर्वाधिक पसंती दिली जाते. स्वयंपाक करायला आवश्यक असणारे पाणी तलावातून आणता येते. त्यामुळे शहरातून जास्तीचे पाणी आणण्याची गरज पडत नाही. सरपण मुबलक आणल्यामुळे घरातून येताना स्वयंपाक तयार करण्याचे जिन्नस आणले की येथे झक्कास स्वयंपाकाचा बेत रंगतो.झुडपं म्हणजे मिनी किचनच..!कास तलावाच्या लगत असलेल्या झुडपांच्या सावलीत दगडांची चुल करून तेथे स्वयंपाक केला जातो. सुट्यांमध्ये येथे येणाºयांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमााणावर वाढत आहे. कित्येकदा घरातून सगळं आठवणीने घेतले तरीही एखादी वस्तू घेण्याची विसरली जाते. कधी कोणाकडे मीठ नसते, तर कधी हळद विसरलेली असते, मसाल्याच्या पुड्या सापडत नाहीत तर कोणाला चूल पेटवायला काडीपेटी विसरल्याचे लक्षात येते. अशा सर्व विसराळूंसाठी ही झुडपे म्हणजे मिनी किचन आहेत. येथे पूर्वी स्वंयपाक करून गेलेले अनेकजण झुडपांमध्ये पुड्या बांधून हळद, मीठ, काडीपेटी, मसाल्याच्या पुड्या ठेवतात. ज्याला गरज आहे, तो त्याचा वापर करतो. आणि स्वत:ची सोय झाल्यामुळे तो पुढे येणाºयासाठी या वस्तू प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ती पिशवी झुडपात सुरक्षित ठिकाणी ठेवली जाते.स्वयंपाक करण्यासाठी कासला पहिली पसंती!कुटूंबाबरोबर पुर्ण एक दिवस मुक्त वातावरणात आणि चुलीवरचं जेवण हवं असेल तर कास तलाव परिसराला सर्वाधिक पंसती दिली जाते. स्वयंपाक करायला मुबलक पाणी आणि सरपणाची मुक्त उपलब्धता या दोन कारणांमुळे येथे स्वयंपाकाच्या चुली पेटतात. वातावरणात कितीही उकाडा असला तरी कास परिसरातील वारे थंड असते म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांत येथे येणाºयांच्या संख्या मोठी आहे.ही असते तयारी...!पूर्ण दिवस व्यतित करायला येणारे सर्व काही तलाव परिसरात बनवतात. पण ज्यांना चुलीवरचा रस्सा खायचा आहे आणि ज्यांच्याकडे वेळ कमी आहे, ते घरातूनच भाकरी, भात, रश्याचा मसाला आदी तयार करून आणतात. तलाव परिसरात आले की रस्सा फोडणीला टाकतात. मुबलक वेळ असणारे मात्र, कांदा, टोमॅटो, पीठ, तांदुळ, दोन तीन पातेले, कढई, पळी, उलतणे आदी सर्व वस्तु सोबत आणतात. जाताना भांडी धुवून वाळवून नेण्याची त्यांची मानसिकता असते.