दहिवडी : माण बाजार समितीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४७ जणांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे १७ जागांसाठी ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे दोन अपक्षासह तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप व रासपचे पॅनेल, प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व अनिल देसाई यांचा गट तर शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे स्वतंत्र पॅनेल रिंगणात उतरले आहे. शंभर अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ४७ जणांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली असून, सतरा जागांसाठी ५३ उमेदवार आहेत.
सहकारी संस्थाचा मतदार संघ सर्वसाधारण सात जागांसाठी २१ उमेदवार आहेत. यामध्ये बाळकृष्ण जगदाळे, कुंडलीक भोसले, रामचंद्र कदम, अंबादास दडस, सूर्याजीराव जगदाळे, अर्जुन बनगर, दत्तात्रय सस्ते, दिलीप वाघमोडे, श्रीमंत काटकर, रमेश यादव, विलास देशमुख, हरिश्चंद्र जगदाळे, दशरथ काटकर, गजानन मोहिते, शिवाजी जाधव, रामचंद्र कापसे, कैलास पोळ, दीपक पोळ, प्रशांत सूर्यवंशी, गुलाब घुटुकडे, पोपट जाधव, महिला राखीवमधून दोन जागेसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये वंदना ओंबासे, निर्मला जाधव, सुमन जगदाळे, शोभा काळेल, वैशाली विरकर, मंदाताई जगदाळे, इतर मागासमधून एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये अमोल राऊत, धनाजी शिंदे, बाळू काळेल.
विमुक्त जाती भटक्या जमाती एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये रामचंद्र झिमल, सतीश घुटुकडे, बाळू गुजर. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघाच्या दोन जागांसाठी सात उमेदवार आहेत. यामध्ये योगेश भोसले, बाळकृष्ण काळे, प्रसाद शिंदे, शंकर गंबरे, पूजा काटकर, शंकर तांबवे, शशिकांत गायकवाड. अनुसूचित जाती-जमाती एका जागेसाठी चार उमेदवार आहेत. यामध्ये रवींद्र तुपे, सचिन केंगार, नितिन खरात, किरण खळवे. आर्थिक दुर्बलच्या एका जागेसाठी शहाजी बाबर, ब्रह्मदेव पुकळे, संजय ओंबासे.
व्यापारी मतदार संघात २ जागेसाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये किसन सावंत, कैलास भोरे, किरण कलढोणे, शेखर गांधी, तानाजी कट्टे, अमर कुलकर्णी आहेत.
अंतिम यादी व चिन्हवाटप गुरुवार, दि.२९ रोजी होणार आहे. मतदान ७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत तर मतमोजणी ८ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी विजया बाबर व यलमर म्हणून काम पाहात आहेत.