शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

टेंभु योजनेच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे सोमवारी एल्गार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 6:48 PM

कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या माण व खटाव तालुक्यातील काही गावे कोणत्याही पाणी योजनेत समाविष्ट झाली नाहीत. शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणाºया गावांनी सोमवारी दि. १० रोजी खटाव तालुक्यातील

ठळक मुद्देविखळे येथे एल्गार परिषदेचे आयोजन

म्हसवड : कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या माण व खटाव तालुक्यातील काही गावे कोणत्याही पाणी योजनेत समाविष्ट झाली नाहीत. शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणाºया गावांनी सोमवारी दि. १० रोजी खटाव तालुक्यातील विखळे येथे एल्गार परिषदेचे आयोजन केल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की कायमस्वरूपी दुष्काळी असणाºया माण व खटाव तालुक्यासाठी १९९५ साली राज्यातील युतीच्या शासनाने कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना के ले. त्यामध्ये उरमोडी, जिहे कटापूर व तर टेंभू उपसा जलसिंचन योजनेचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये उरमोडी योजनेतून माण तालुक्यातील कुकुडवाड व खटाव तालुक्यातील पूर्वेकडे असणारी विखळे, कलेढोण, कणकत्रे, ढोकळवाडी, हिवरवाडी, तरसवाडी, औतरवाडी व माण तालुक्यातील कुकुडवाड, पुकलेवाडी, मानेवाडी, मस्करवाडी, आगासवादी, धनवडेवाडी, भाकरेवाडी, व विरळी परिसराचा समावेश नाही. या गावांना टेंभू योजनेतून पाणी मिळणे शक्य आहे. इतर कोणत्याही योजनेतून या गावांना पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती सद्या आहे. माण व खटाव तालुक्यातील वंचित गावांना टेंभू योजनेतून पाणी मिळाले नाही. त्यामुळे या गावातील नागरिक धास्तावले आहेत.गावांना पाणी द्यात्यामुळे या वंचित गावांना टेंभू योजनेतून पाणी मिळाले पाहिजे अशी मागणी या सर्व गावातील नागरिकांनी केली आहे. त्यामुळे तेथील लोकांचा शेती व पिण्याच्या प्रश्न मिटणार असे चित्र दिसत आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTembhu Projectटेंभू धरण