सातारा : नरवणे (ता. माण) येथील दॅट्स सॉल्व फिटनेस क्लबच्या सदस्यांनी अठरा किलोमीटरचं अंतर धावून भारताचा महान धावपटू मिल्खा सिंग यांना अनोख्या स्वरूपाची श्रद्धांजली वाहिली.
या क्लबच्या संकल्पनेतून नरवणे ते गोंदवले आणि गोंदवलेपासून पुन्हा नरवणे असे अठरा किलोमीटर धावत जाऊन मिल्का सिंग यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली. नरवणे येथील बहुसंख्य तरुण हे देशसेवेमध्ये आहेत. देशसेवा करण्याची प्रेरणा माजी सैनिकांकडून त्यांना वेळोवेळी मिळत असते. गावातील नवयुवक देखील सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची, असा मनोधैर्य मनाशी बाळगून असतात. निवृत्त माजी सैनिक दीपक काटकर, कैलाश काटकर आणि संतोष फौजी हे प्रामुख्याने सक्रिय आहे. गावातील माजी सैनिक सध्या तरुणांना देशप्रेमाचा धडा शिकवत आहे. या वेळी चेतन काटकर, गणेश काटकर, अनिकेत काटकर, सिद्धांत काटकर, अनिरुद्ध पिसाळ, हर्षद काटकर, अथर्व मोहोळकर आणि श्रेयस काटकर या सर्वांच्या प्रयत्नातून एक आदर्शवत क्लब भरारी घेत आहे.
===Photopath===
270621\1029-img-20210626-wa0030.jpg
===Caption===
दॅट्स सॉल्व फिटनेस क्लबच्या उपक्रमातून मिल्खा सिंग यांना अनोखी श्रद्धांजली