शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबईत भाजपाला धक्का! तिकीट नाकारताच संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निलेश राणेंचं ठरलं! धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढणार
3
निवडणुकीपूर्वी अजित पवारांना 'सुप्रीम' दिलासा; घड्याळ चिन्हाबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! 
4
सोन्याची किंमत नव्या शिखरावर, चांदीही लाखाच्या पार; खरेदीपूर्वी पाहा १८ ते२४ कॅरेट सोन्याचे दर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : " सापडलेल्या पाच कोटी प्रकरणी संजय राऊतांची चौकशी व्हावी,", अजितदादांच्या नेत्याने केली मागणी
6
इनोव्हामध्ये ५ कोटींची रोकड सापडली, पण कारमालकाने केला वेगळाच दावा; जबाबदारी झटकत म्हणाला...
7
आचारसंहितेचं उल्लंघन होतंय; मग करा 'सी-व्हिजिल एप'वर तक्रार!
8
ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, इमारत कोसळली, ९ कर्मचारी गंभीर जखमी 
9
"मी यापुढे कधाही.."; प्रभासला 'जोकर' म्हणाल्यानंतर ट्रोल झालेल्या अर्शद वारसीचं मोठं विधान, म्हणाला-
10
महागाईचा सामना करण्यासाठी सरकारला अंबानींची साथ; Reliance Retailमध्ये मिळणार स्वस्त डाळ, तांदूळ?
11
जळगावमधील उद्धव सेनेचे इच्छुक मुंबईत ठाण मांडून, मविआच्या जागांचा फैसला होईना...
12
...म्हणून पृथ्वी शॉला मुंबईच्या संघातून काढलं; कारण वाचून तुम्हीही डोक्याला लावाल हात
13
माझ्या बापाविषयी बोलाल तर खबरदार, तुमचे काय वाईट केले: जयश्री थोरात यांचा पलटवार
14
मॉडेलिंगचं स्वप्न, १५ वर्षे मोठ्या अधिकाऱ्यासोबत लग्न, घटस्फोटानंतरही राहत होते एकत्र, आता सापडला तरुणीचा मृतदेह  
15
नाशिकमध्ये कुठे नाराजी, कुठे धुसफूस; तर कुठे बंडखोरीची दिसताहेत चिन्हे!
16
"बबिता फोगटला ब्रिजभूषण सिंहांची जागा घ्यायची होती, म्हणून...", साक्षी मलिकचा मोठा दावा
17
१५९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच HSBC मध्ये महिला CFO ची नियुक्ती; पाहा कोण आहेत पाम कौर?
18
७ ऑक्टोबरच्या हल्ल्यातून वाचलेल्या तरुणीने वाढदिवशी उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबीय म्हणतात...
19
"शब्द दिला असताना तिकीट नाकारलं"; संदीप नाईकांचा भाजपला रामराम, तुतारी हाती घेण्याची शक्यता
20
सर्फराज खानच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; भारतीय खेळाडू आता 'बापमाणूस'!

Satara: मित्राच्या वडिलांना पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न, मुख्य संशयितासह चार जण ताब्यात

By दत्ता यादव | Published: June 12, 2024 3:33 PM

सातारा : मित्रासोबत झालेल्या भांडणातून त्याच्या वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार पाटखळ, ता. सातारा येथे मंगळवारी रात्री साडेदहा वाजता ...

सातारा : मित्रासोबत झालेल्या भांडणातून त्याच्या वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार पाटखळ, ता. सातारा येथे मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयितासह चाैघांना ताब्यात घेतले आहे.अनिल मधुकर शिंदे (वय ४४, रा. पाटखळ, ता. सातारा), असे जखमीचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनिल शिंदे यांचा मुलगा प्रज्वल आणि संशयित तरुण या दोघांची मैत्री होती. त्यामुळे त्याचे प्रज्वलच्या घरी येणे-जाणे असायचे. वर्षभरापूर्वी प्रज्वलचे लग्न झाले. त्यावेळी लग्नामध्ये धक्का लागल्याच्या कारणातून संशयित तरुणाची वादावादी झाली होती. त्यामुळे दोघा मित्रांमध्ये बोलणे नव्हते. 

मात्र, पूर्वीचा राग मनात धरून संशयित तरुण हा तीन मित्रांना सोबत मंगळवारी रात्री शिंदे यांच्या घरी गेला. त्यावेळी घरात प्रज्वलची आई उज्ज्वला शिंदे या एकट्याच होत्या. तर प्रज्वल पुण्यात आणि वडील बाहेर गेले होते. प्रज्वलला आता फोन करून माफी मागायला सांगा, असं त्याच्या आईला तो सांगत होता. आईने हो, सांगते. तुम्ही दोघे भांडू नका, असं सांगितले. त्यानंतर तेथून ते सर्व निघून गेले.परंतु काही वेळानंतर प्रज्वलचे वडील अनिल शिंदे हे दुचाकीवरून घरी आले. याचवेळी संशयित तरुणाने पाठीमागून येऊन सोबत आणलेली पेट्रोलची बाटली त्यांच्या अंगावर ओतली. त्यानंतर लायटरने आग लावली. अनिल शिंदे आरडाओरड करत असल्याचे पाहून त्यांच्या पत्नी धावत घरातून बाहेर आल्या. क्षणाचाही विलंब न करता अनिल शिंदे यांनी अशा अवस्थेतही बोअरचे बटण सुरू केले. स्वत: पाण्याचे फवारे अंगावर घेऊन पेटते शरीर विझविले. या प्रकारानंतर संबंधित संशयित तेथून पसार झाले. जखमी शिंदे यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये ते ५६ टक्के भाजून ते जखमी झाले आहेत.सिव्हिलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्यात आले.दरम्यान, या घटनेनंतर सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नेमका काय प्रकार झालाय, हे समजून घेऊन त्यांनी तत्काळ आरोपींना अटक करण्याची व्यूहरचना आखली. मुख्य संशयितासह चाैघांना मध्यरात्री ताब्यात घेतले. या गुन्ह्यात नेमका कोणाकोणाचा सहभाग आहे, हे तपासून त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.एवढा राग मनात असेल, याची कल्पनाही नव्हती..माझ्या मुलाची आणि त्याची चांगली मैत्री होती. तो आमच्या घरात सतत यायचा. जेवणही करायचा; पण दोघांमध्ये किरकोळ मतभेद झाल्यानंतर तो माझ्या मुलाचा एवढा राग मनात ठेवून असेल, याची कल्पनाही नव्हती. पूर्ण तयारीनिशी तो पेट्रोल घेऊन आला होता. असे उज्ज्वला शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस