शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

कार्यकारी समितीतून ‘त्रिमूर्ती आऊट’च

By admin | Published: May 24, 2015 11:13 PM

डीसीसीची पहिली बैठक : अखेर ‘लोकमत’चे वृत्त खरे ठरले

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील धोरणात्मक निर्णयाचा आत्मा असणारी कार्यकारी समिती गठित झाली असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन १८ संचालकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताप्रमाणे खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे आणि माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर हे तिघेजण या समितीबाहेरच राहिले आहेत. दरम्यान, या समितीची सुमारे दीड महिन्यानंतर पहिली बैठक झाली. यामध्ये अनेक कर्ज प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. सातारा जिल्हा बँकेची निवडणूक दि. ५ मे तर मतमोजणी ७ मे रोजी झाली. या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, अनिल देसाई आदींसह सातजण बिनविरोध निवडून आले होते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमधील १८ संचालक बँकेत आहेत. तर खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर स्वतंत्र आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी बंद लखोट्याचा उल्लेख केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेत धोरणात्मक निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कार्यकारी समितीत उदयनराजे यांच्यासह आमदार गोरे, उंडाळकर यांना स्थान मिळणार नाही, अशी अटकळ बांधण्यात येत होती. असे वृत्तही सर्वप्रथम ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. ‘लोकमत’चे हे वृत्त अखेर खरे ठरले आहे. बँकेतील कार्यकारी समिती स्थापन झाली असून, राष्ट्रवादीच्या सर्व १८ संचालकांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे. खासदार उदयनराजे, आमदार गोरे आणि माजी आमदार उंडाळकर यांना बाहेरच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसाठी ही त्रिमूर्ती परकीच ठरली आहे. (प्रतिनिधी)अनेक प्रकरणांना मिळाली मंजुरी...जिल्हा बँकेतील कार्यकारी समिती ही महत्त्वपूर्ण असते. दर आठवड्याला येणारी कर्जप्रकरणे या समितीपुढे येतात. समितीच्या निर्णयावरच ती मंजूर होत असतात. तसेच अनेक निर्णयही ही समिती घेऊ शकते. त्यामुळे समितीत येण्यासाठी अनेकांची धडपड असते. समिती स्थापन झाल्यापासून पहिलीच बैठक शनिवारी बँकेत झाली. सुमारे दीड महिन्यानंतर ही बैठक झाली. अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला समितीतील अनेजण उपस्थित होते. यावेळी अनेक कर्ज प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.