पुलाकडेला कचरा
कऱ्हाड : वारुंजी फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या जुन्या लोखंडी ब्रिटिशकालीन पुलाच्या सुरुवातीस मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे. काचेच्या बाटल्या, थर्माकॉल, प्लास्टिक पिशवी, बॉटल आदींसह खाद्यपदार्थ कचऱ्यामध्ये पडत असल्याने त्यातून दुर्गंधी येत आहे. येथे नेहमीच प्रत्येक प्रकारचा कचरा टाकण्यात येतो. ग्रामपंचायतीने लक्ष देणे गरजेचे आहे.
रस्ता खड्ड्यात
कोपर्डे हवेली : बनवडी फाट्यापासून कोपर्डे हवेलीपर्यंत कऱ्हाड-मसूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सिंदल ओढ्यानजीक तर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खड्डे मुजविण्याची मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.
उपमार्गावर अंधार
कऱ्हाड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत सेवारस्त्यांवर विजेची व्यवस्था नसल्याने अंधाराचे साम्राज्य पाहावयास मिळते. उपमार्गावरून रात्री सायकलने प्रवास करणे अथवा पायी चालत जाणे धोक्याचे बनले आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावर दिव्यांची व्यवस्था करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहनांची संख्या कमी असल्याने सेवा रस्त्यावर काहीच दिसत नाही.