वेळे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट उतरताना रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकरचा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झाला. अपघातातून चालकसह क्लिनर थोडक्यात बचावले.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रसायनाची वाहतूक करणारा टँकर मुंबईहून उटी येथे निघाला होता. खंबाटकी घाट उतरत असताना टँकरचा ब्रेक निकामी झाला. चालक नियाज अहमद (वय ३३, उत्तरप्रदेश) यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकर एका वळणावर उलटला. क्लीनर शाहनवाज खान (वय २२, भोपाळ) व चालक नियाज अहमद हे दोघेच या टँकरमध्ये होते.टँकरउलटल्यामुळे त्यात असणारे नायट्रिक अॅसिड बाहेर येऊन लागले. त्यामुळे वातावरणाशी संयोग होऊन मोठ्या प्रमाणात धूर येऊ झाला. या अपघाताची माहिती मिळताच भुईंजचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. टँकरमध्ये ज्वलनशील नायट्रिक अॅसिड असल्याने आग लागण्याची शक्यता वर्तविली विचारात घेऊन त्यांनी खंबाटकी घाटातील वाहतूक बंद केली.
रसायनाची वाहतूक करणारा टँकर उलटला, चालकासह दोघे बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 11:58 AM
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट उतरताना रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकरचा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झाला. अपघातातून चालकसह क्लिनर थोडक्यात बचावले.
ठळक मुद्देरसायनाची वाहतूक करणारा टँकर उलटला, चालकासह दोघे बचावले खंबाटकी घाटात ब्रेक निकामी झाल्याने अपघात