लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : हंगामी व्यावसायिकांना यंदाही विठ्ठलाचा आधार मिळाला आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला जाताना आवश्यक असणारे तुळशी अन् चंदनाची पाने विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी यंदाही दिवसाला हजारो रूपये कमवुन आषाढी साजरी केल्याचे चित्र शहरातील मंदिराबाहेर पहायला मिळाले.देशात सर्वाधिक मोठी कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने केली आहे, बा विठ्ठला, आता शेतकरी कर्जमुक्त होऊ दे ! असे साकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरला विठ्ठलाकडे घातले. ज्या भक्तांना पंढरीला जाता आले नाही त्यांनी शहर व परिसरात असणाऱ्या मंदिरांमध्ये जावुन विठ्ठु रखमाईचे दर्शन घेतले. विठ्ठल दर्शनाला आवश्यक असणारे तुळशी अन् चंदनाचे पान विक्रीने यंदाही उच्चांक केली आहे. शहरातील मंदिराबाहेर सातशेहुन अधिक भक्तांनी पाच रूपयात याची खरेदी करून ते विठ्ठल चरणी अर्पण केल्याचे विक्रेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.शहरात तुळशी विकतचीच !निसर्गाच्या सानिध्यात सातारा वसले असले तरी वाढत्या अपार्टमेंटच्या जंगलामुळे आता दारातील तुळशी वृंदावनाची जागा गॅलरीतील तुळशीच्य रोपांनी घेतली आहे. पुरेशा सुर्यप्रकाशाअभावी ही रोपं खुरटीच राहतात. त्यामुळे गॅलरीत तुळस असुनही शहरात विठुरायाच्या भेटीसाठी जाताना तुळशी विकतचीच घ्यावी लागते.चंदनाच्या पानांची कमतरताशहर व परिसरात चंदनाच्या झाडांची लागवड अल्प आहे. जिथे कुठे चंदनाचे झाड वाढलेले दिसते, त्यावर रात्री चोरटे कुऱ्हाडी मारतात. त्यामुळे यंदाही चंदनाच्या पानांची कमतरता जाणवली. त्यामुळे यंदाही तुळशीच्या पाच पानांबरोबर एक चंदनाचे पान विक्रीस होते.
तुळशी-चंदनानं दिला रोजगाराचा सुगंध!
By admin | Published: July 04, 2017 10:52 PM