कऱ्हाड : येथील पी़ डी़ पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशभक्तिपर समूह गीत-गायन स्पर्धा घेण्यात आल्या़ प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटांत या स्पर्धा घेण्यात आल्या़ प्राथमिक विभागातील १४ शाळांमधील सुमारे पाच हजार व माध्यमिक विभागातील ९ शाळांतील सुमारे सात हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले़ स्पर्धांचे उद्घाटन आमदार बाळासाहेब पाटील, डॉ़ अशोकराव गुजर व मुकुंदराव कुलकर्णी अशा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले़ प्र्राथमिक विभागात का़ ना़ पालकर आदर्श प्राथमिक शाळा, प्रथम, एस़ एम़ एस़ इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय, नूतन मराठी शाळा तृतीय तर सरस्वती विद्यामंदिर व आदर्श प्राथमिक शाळा उत्तेजनार्थ क्रमांकासह यशस्वी झाल्या़ माध्यमिक गटात टिळक हायस्कूल प्रथम, लाहोटी कन्या प्रशाला द्वितीय, संत तुकाराम हायस्कूल तृतीय, तर एस़ एम़ एस़ इंग्लिश मीडियम स्कूल व विठामाता विद्यालय यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला़ नगरपरिषदेच्या शाळांमध्ये शाळा क्रमांक ९, प्रथम, शाळा क्रमांक ५, द्वितीय, शाळा क्रमांक ७ तृतीय तर शाळा क्रमांक ११ व १० यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला़ पारितोषिक वितरण समारंभ पुढील महिन्यात होणार आहे. (प्रतिनिधी)
बारा हजार मुलांचा एक सूर, एक ताल
By admin | Published: January 28, 2015 10:44 PM