मंदिर दुर्लक्षित
कार्वे : येथील ग्रामदैवत व पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकचे श्रद्धास्थान असणाऱ्या चारशे वर्षांपूर्वीच्या धानाईदेवी मंदिरामध्ये भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. सोयी-सुविधा मिळत नसल्याने देवीच्या दर्शनासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
ज्वारी समाधानकारक
कुडाळ : यंदाचा रब्बी हंगाम पिकांसाठी उपकारक ठरत असून, सायगाव पश्चिम भागातील ज्वारीचे पीक समाधानकार आहे. पाण्याचे अपुरे स्रोत आणि प्रतिकूल हवामानाचा फटका कायम या विभागाला बसत आला आहे. मात्र, यंदा भरघोस पीक आले आहे.
रिक्षाचालकांची अरेरावी
सातारा : साताऱ्यातील अनेक ठिकाणी रिक्षाचालक प्रवाशांची वाट पाहत थांबलेले असतात. त्यामुळे रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी काढता येत नाही. तेथून काही अंतरावरच असलेल्या रिक्षाथांब्यातील रिक्षा निघून जाण्याची वाट पाहात ते थांबलेले असतात. रिक्षा पुढे घेण्यास सांगितले, तर वादावादीच्या घटना घडत आहेत. त्याचवेळी एखाद्या दुचाकीस्वाराने चुकून रिक्षाथांब्यावर गाडी लावलेली असल्यास एकही रिक्षाचालक सहन करुन घेत नाही. त्यामुळे रिक्षाचालकांना अन्यत्र कोठेही रिक्षा उभ्या करण्यास मनाई करावी, अशी मागणी होत आहे.