अकरावी रेस्ट इयर समजलेल्या विद्यार्थ्यांना गुणांकनात घसरणीची भीती
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्यातील बारावीच्या शिक्षण मंडळाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर महिना उलटून गेला तरीही अद्याप शिक्षण मंडळाकडून त्याच्या निकालाची मूल्यमापनाचे सूत्र आणि पध्दती जाहीर करण्यात आलेली नाही. मूल्यमापनाचे सूत्र कसे आणि काय असेल, याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात मात्र धाकधूक वाढली आहे.
बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने ३ जून रोजी जाहीर केला. त्यांनतर शिक्षण मंडळ, तज्ज्ञ आणि शिक्षणमंत्र्यांच्या बैठका सुरू झाल्या. दरम्यान, सीबीएसई मंडळाच्या मूल्यमापनाच्या धर्तीवर बारावी शिक्षण मंडळाच्या निकालाचे सूत्र मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार तयार करण्यात आले आहे. त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होऊन ते जाहीर होण्याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे.
दरम्यान, सीबीएसईच्या निकालासाठी ३०:३०:४० असे सूत्र वापरण्यात आले आहे. त्याच धर्तीेवर बारावी राज्य शिक्षण मंडळाच्या निकालासाठीही दहावी, अकरावीच्या गुणांचा विचार करणे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे.
पॉईंटर
मुले :
मुली :
तृतीयपंथी :
एकूण :
चौकट
अकरावीच्या गुणांचा अंतर्भाव बारावीत नको
राज्य शिक्षण मंडळाने अकरावीच्या गुणांना सीबीएसईप्रमाणे ३० टक्के वेटेज दिले तर अंतिम गुणांकनात घसरण होण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे, २०१९-२०२० या वर्षात उशिरा सुरू केलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया आणि उरलेल्या काही महिन्यांत पूर्ण न झालेला अभ्यासक्रम यामुळे विद्यार्थ्यांनी स्वाध्याय, गृहपाठ, चाचण्या यांच्याकडे लक्ष न दिल्याने ते रेस्ट इयर म्हणूनच गेल्याच्या प्रतिक्रिया ते देत आहेत. यातच जर अकरावीच्या गुणांचा अंतर्भाव बारावी निकालात होणार असेल तर निश्चितच निकाल खाली घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळ आता बारावीच्या मूल्यांकनासाठी नेमके काय सूत्र ठरवणार, याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.
बारावी मूल्यांकनाची अद्यापही प्रतीक्षाच
बारावीचे राज्यातील लाखो विद्यार्थी राज्य मंडळाच्या बारावी मूल्यांकनाचे निकष काय तयार झाले, याबाबत प्रतीक्षा करत आहेत. पुढील दोन दिवसात हे निकष जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीबीएसईप्रमाणेच दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्षांचे गुण ग्राह्य धरून अंतर्गत मूल्यमापन केले जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बारावीच्या परीक्षांचे निकष जाहीर झाल्यानंतर ३१ जुलैपर्यंत या परीक्षांचा निकालही राज्य शिक्षण मंडळांनी जाहीर करायचा आहे. त्यामुळे निकालासाठी राज्य शिक्षण मंडळाला कमी वेळ मिळण्याची शक्यता असल्याने मूल्यमापनाचे निकष जाहीर होण्याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे.
कोट
बारावीच्या ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास अपूर्ण राहिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तर या काळात सर्वाधिक परिणाम झाला. अकरावीच्या वर्षात विद्यार्थी गंभीरपणे अभ्यास करत नाहीत. त्यामुळे अकरावी, बारावीच्या गुणांचे पूर्ण नियंत्रण महाविद्यालयांच्या हातात असणार आहे. अशात दहावीची परीक्षा ही शिक्षण मंडळाची असल्याने त्यात गुणांचे समानीकरण असल्याने त्यात गुणांचे समानीकरण होण्यास मदत होईल आणि हुशार विद्यार्थ्यांवरही अन्याय होणार नाही.
- प्रा. डॉ. चंद्रकांत माने, पाटण
बारावीचा निकाल कसा आणि कुठल्या सुत्रावर लागणार, हे निश्चित नसल्याने पुढील प्रवेशासाठी कुठला पर्याय निवडावा याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. दहावी, अकरावीच्या गुणांचा अंतर्भाव असणार असेल तर निकालाचा त्या पध्दतीने अंदाज घेऊन पुढील प्रवेशाबाबत तरी निर्णय घेणं शक्य होईल. मात्र, अद्याप यातील काहीच झाले नसल्याने पदवी प्रवेशाबाबत संभ्रम जाणवतोय.
- वरूण आपटे, विद्यार्थी
शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होणार असल्याने कमीत कमी वेळात अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत पुढील काळात शिक्षकांना करावी लागणार आहे. बारावीचा निकाल उशिरा जाहीर होण्याची चिन्हे असल्याने पदवी प्रवेशाला आणि त्यासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षांनाही उशीरच होणार, हेही निश्चित झाले आहे.
- प्रियांका जगताप, विद्यार्थिनी
..............