शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

‘टेंभू’ची बारा लाखांची तार लंपास

By admin | Published: September 17, 2015 12:48 AM

माहुलीतील घटना : चाकू, लोखंडी गजाचा धाक दाखवून कृत्य

विटा : माहुली (ता. खानापूर) येथे टेंभू योजनेच्या टप्पा क्र. ३ वरील विद्युत साहित्याच्या गोदामामधील पहारेकरी व आॅपरेटरना लोखंडी गज व चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी ११ लाख ७० हजार रुपये किमतीची सुमारे २३४ मीटर तांब्याची तार लंपास केली. ही घटना मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली असून, तार लंपास करण्यासाठी वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनांचे क्रमांक विटा पोलिसांच्या हाती लागले आहेत. माहुली येथे टेंभू योजनेच्या टप्पा क्र. ३ मध्ये महालक्ष्मी इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीच्या विद्युत साहित्याचे गोदाम आहे. त्यात अक्षयकुमार रामचंद्र पवार, परशुराम तोरणे व विश्वास कचरे हे तीन आॅपरेटर आणि चंद्रकांत भोसले हा पहारेकरी वास्तव्यास आहेत. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास सात ते आठ चोरट्यांनी गोदामाचे तारेचे कुंपण तोडून टेम्पो व मारुती व्हॅन गोदामामध्ये आणली. त्यावेळी चोरट्यांनी ११ लाख ७० हजार रुपये किमतीची सुमारे २३४ मीटर तांब्याची तार आणलेल्या गाड्यात भरली. वाहनांच्या आवाजाने आपरेटर व पहारेकरी झोपेतून जागे झाले. अक्षयकुमार पवार यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी चोरट्यांकडे धाव घेतली. मात्र चोरट्यांनी कर्मचाऱ्यांना लोखंडी गज व चाकूचा धाक दाखवून तार लंपास केली. बुधवारी आॅपरेटर अक्षयकुमार पवार यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली. त्यावेळी पोलिसांना चोरट्यांनी चोरीत वापरलेल्या वाहनांचे क्रमांकही मिळाले आहे. त्याची माहिती पोलिसांनी गोपनीय ठेवली आहे. पोलीस तपास करीत आहेत. (वार्ताहर)