हणबरवाडी येथील धनगर वस्तीतील दोन पाळीव देशी कोंबड्या गुरूवारी रात्री मृत्युमुखी पडल्या. तर दुसºया दिवशी पहाटे व सकाळी आठ कोंबड्या मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यामध्ये रमेश कोळेकर यांच्या ५, बाळकृष्ण कोळेकर यांच्या २, सतीश कोळेकर यांची १, मधुकर पोळ यांच्या २ अशा एकूण दहा कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. त्यानंतर शनिवारी आणखी दोन कोंबड्या अज्ञात रोगाने मृत्यूमुखी पडल्या. सध्या बर्ड फ्लूचे संकट काही ठिकाणी ओढवले असून त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए. टी. परिहार, कºहाडचे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. बोर्डे, पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉ. उंडेगावकर आदींनी हणबरवाडीत भेट दिली. मृत कोंबड्यांची पाहणी करून नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.
- चौकट
खबरदारी घेण्याचे आवाहन....
हणबरवाडी येथे पाळीव पक्षांच्या सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले असून गावात सुमारे साडेबाराशे पक्षी आढळून आले आहेत. कोंबड्यांच्या खुराड्यांची स्वच्छता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पक्ष्यांबाबत कोणतीही अडचण आल्यास पशुधन विकास अधिकारी डी. के. कोकरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.