कोयनानगर : श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या आठवा दिवशी दुसरा टप्पा जाहीर करून सुमारे पंचवीस हजार प्रकल्पग्रस्त व कुटुंबीय सदस्यांनी एक वेळ अन्नत्याग करत आंदोलन सुरू ठेवले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सह्याद्री अतिथीगृह येथील निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावर ठाम असलेल्या प्रकल्पग्रस्त आंदोलनाचा सोमवारी दुसरा टप्पा सुरू होत आहे. यामध्ये राज्यातील सात जिल्ह्यांतील साडेपाच हजार कुटुंब खातेदार व त्यांचे कुटुंबीय असे एकूण पंचवीस हजार ते सव्वीस हजार लोक सहभागी झाले आहेत.
कोयनेचे प्रश्न हे सातारा जिल्ह्यातील अधिकारीच लांबवत आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गावागावात एक वेळचे अन्नत्याग करून आपल्या दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. ही लढाई निकराने व प्रत्यक्षात अंमलबजावणी प्रारंभ न झाल्यास आरपारची लढाई लढू, असा इशारा कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त जनतेने दिला आहे. वेळ पडल्यास अधिक आंदोलन तीव्र करून होणाऱ्या परिणामास सातारा जिल्ह्याचे प्रशासन व राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलनात सातारा, सांगली जिल्ह्यातील लोक सहभागी असून, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर व हरिचंद्र दळवी हे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.
(चौकट)
आंदोलनकर्त्यांकडून निषेध...
सातारा जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचे जे काम आता सुरू आहे ते काम म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशा पद्धतीने सुरू आहे. त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळेच विलंब होत आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
===Photopath===
240521\img-20210524-wa0026.jpg
===Caption===
कोयना धरणग्रस्तांची चौथी पिढीही आंदोलनात सक्रिय