शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

चोवीस तास रंगला विसर्जन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 12:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आसमंत दुमदुमून टाकणारा ढोल-ताशांचा नाद, पारंपरिक वेशभूषेत एकत्र आलेले सातारकर, मिरवणूक पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जमलेले आबालवृध्द आणि ‘गणपती बाप्पा मोरया.... पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त हाक देत बाप्पांना निरोप देणाºया भक्तांच्या मांदियाळीत मंगळवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेला मिरवणुक सोहळा बुधवारी सकाळी आठपर्यंत तब्बल २४ ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आसमंत दुमदुमून टाकणारा ढोल-ताशांचा नाद, पारंपरिक वेशभूषेत एकत्र आलेले सातारकर, मिरवणूक पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जमलेले आबालवृध्द आणि ‘गणपती बाप्पा मोरया.... पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त हाक देत बाप्पांना निरोप देणाºया भक्तांच्या मांदियाळीत मंगळवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेला मिरवणुक सोहळा बुधवारी सकाळी आठपर्यंत तब्बल २४ तास रंगला.शहरातील बहुतांश मंडळांनी सकाळी लवकर गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढल्या होत्या. त्यामुळे सकाळपासूनच चिमुरड्यांसह भक्तांची गर्दी शहरातील मुख्य रस्त्यांवर सुरू झाली होती. परंपरेने सातारा पालिकेच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, आरोग्य सभापती सविता फाळके, पाणीपुरवठा सभापती सुहास राजेशिर्के, सुजाता राजेमहाडिक, बांधकाम सभापती किशोर शिंदे, सीता हादगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आली. त्यानंतर शहरातील अन्य गणेशोत्सव मंडळे या मिरवणुकीत सहभागी झाली.शहरातील मानाच्या शंकर-पार्वती गणपतीचे विसर्जन बुधवारी सकाळी पाऊणेआठ वाजता झाले. त्यानंतर शहरातील विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली.पोलिसांचीसहकुटुंब ड्यूटीगणेशोत्सव काळात बंदोबस्त असल्यामुळे पोलिसांना सहकुुटुंब हा उत्सव साजरा करता येत नाही. कित्येकदा कुटुंब एका शहरात आणि ड्यूटी दुसºया शहरात अशी परिस्थिती पोलिसांकडे असते. गेल्या काही वर्षांत उत्सव काळात पोलिसांवरील ताण कमी झाला आहे. त्यामुळे संध्याकाळी कुटुंबीयांना विसर्जन मिरवणुकीत बोलावून त्यांच्याबरोबर ‘आॅन ड्युटी’ फिरण्याचा आनंद काही पोलिसांनी घेतला.खेळण्यांनी याड लावलंमिरवणुकीत गणपती बाप्पा आणि विविध मंडळांनी आयोजित केलेले खेळ पाहण्यासाठी आणि मुलांनाही ते दाखविण्यासाठी पालकांची धडपड होती. मुलं अंधाराचा आसरा घेऊन बसणाºया विक्रेत्यांकडे आकर्षित होत होती. लाईट लागणारी शिंग, पोंगा, यांच्यासह शिट्या आणि ताशा यांचे आकर्षण मुलांना होते. पालक विसर्जन मिरवणुकीत डोके घालून होते तर मुलं खेळणी बघण्याकडे त्यांना ओढत होते.महावितरणही सज्जगेल्या काही वर्षांत शहरातील मंडळांची संख्या वाढली आहे. वाढत्या संख्येबरोबरच बाप्पांच्या मूर्तीचा आकारही दिवसेंदिवस उंच होत आहे. बाप्पांची उंच मूर्ती कित्येकदा महावितरणच्या वायर तोडत पुढे येते. यामुळे किरकोळ अपघातांचीही संख्या वाढली. उत्सव काळात अपघात टाळण्यासाठी महावितरणचे दत्तात्रय साठे आणि संजय कार्वे यांच्यासह पंचवीस वायरमनवर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. विसर्जनासाठी मुख्य रस्त्यावर गणपतीची मूर्ती आली की, परिसरातील विजवाहक तारांचा विद्युत प्रवाह बंद करून मिरवणूकपुढे मार्गस्थ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. मंगळवारी दुपारी दोन पासून बुधवारी सकाळी आठपर्यंत त्यांनी आपले कर्तव्य बजावले.खेळाडूंचे नृत्यसादरीकरणसातारा येथील शिवाजी उदय मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत छोट्या व मोठ्या खेळाडूंनी अप्रतिम नृत्य सादर करून दरवर्षी प्रमाणे पारंपरिक पद्धतीने मानाची मिरवणूक काढली. यावेळी मंडळाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट पारंपरिक नृत्य सादर केले. चांदीच्या पालखीतून ही मिरवणूक काढण्यात आली होती.