शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

तब्बल वीस हजार ‘पॉझिटिव्ह’ झाले ‘निगेटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:36 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना थैमान घालत असतानाच एक दिलासादायक बातमीसमोर आली आहे. गेल्या दहा दिवसांत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना थैमान घालत असतानाच एक दिलासादायक बातमीसमोर आली आहे. गेल्या दहा दिवसांत सुमारे वीस हजार रुग्ण कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न अन‌् रुग्णांच्या इच्छाशक्तीपुढे कोराेनाही आता हात टेकू लागला आहे.

कोरोनामुळे अवघा जिल्हा हतबल झाला आहे. दररोज दोन ते अडीच हजार नवे रुग्ण अन‌् ४५ ते ५० बाधितांचा मृत्यू होत असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. संचारबंदी असूनही कोरोनाबाधितांची संख्या काही कमी झालेली नाही. मात्र, गेल्या आठ-दिवसांपासून बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही दिलासादायक आहे.

दि. ६ ते १५ मे या दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल १९ हजार ८२९ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहे. दि. १४ मे रोजी कोरोनामुक्तीच्या आकड्याने उच्चांक गाठला. या एकाच दिवसात तब्बल ३ हजार ६६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एप्रिल महिन्यात कोरोनाने अक्षरश: हाहाकार माजविला होता. एकाच महिन्यात कोरोनाचे तब्बल ३७ हजार नवे रुग्ण आढळून आले, तर ५८६ जणांचा मृत्यू झाला. मात्र, मे महिन्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणा व नागरिकांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे.

(चौकट)

आरोग्य सुविधांमध्ये वाढ

कोरोनाबाधितांसाठी बेड तसेच इतर आरोग्य सुविधांची सर्वत्र कमतरता भासू लागली होती. त्यामुळे उपचार वेळेत मिळत नसल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाणही अधिक होते. ही विदारक परिस्थिती बदलण्यासाठी आता विविध सामाजिक संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी व तरुणाई कोरोनाच्या लढ्यात उतरली आहे. अनेकांनी आपल्या गावात बेड तसेच आक्सिजन, रुग्णवाहिका व इतर वैद्यकीय सुविधांची व्यवस्था केली आहे.

(पाॅइंटर)

दहा दिवसांतील स्थिती

दि. कोरोनामुक्त

६ १५९५

७ २०५५

८ १९३६

९ १५१६

१० २५०६

११ १०७२

१२ ८२७

१३ २२८१

१४ ३६६२

१५ २३७९

एकूण १९,८२९

लोगो : पॉझिटिव्ह स्टोरी