शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

सातारा जिल्ह्यात दोन ‘केबल स्टे ब्रिज’ उभारण्यात येणार, पर्यटन वाढीस चालना मिळणार

By सचिन काकडे | Published: August 10, 2023 6:09 PM

२५ किलोमीटर अंतराचा प्रवासही वाचणार

सातारा : बामणोली, तापोळा भागात पर्यटन वाढीसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या बामणोली-दरे आणि आपटी-तापोळादरम्यान सी लिंक पद्धतीचे दोन ‘केबल स्टे ब्रिज’ उभारण्यात येत आहेत. या पुलामुळे आपटी, वाकी, तेटली, बामणोली आदी गावांना फायदा होणार असून, २५ किलोमीटर अंतराचा प्रवासही वाचणार आहे, अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.सातारा येथे गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जावळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. एस. पवार, शाखा अभियंता नीलेश कोहाळे, महेश कुन्हाळीकर, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यासह बामणोली भागातील ग्रामस्थ उपस्थित होते.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘बामणोली ते दरे असा ७२० मीटरचा ‘केबल स्टे ब्रिज’ होणार असून बामणोली बाजूला १५० मीटर तर दरे बाजूला ४५० मीटर पोहोच मार्ग होणार आहेत. याचा लाभ आसपासच्या सर्वच गावांना होणार आहे. तर १५० कोटी निधीतून आपटी ते तापोळा असा ५६० मीटरचा केबल स्टे ब्रिज उभा राहणार आहे. आपटी बाजूस २०० मीटर तर तापोळा बाजूस ३०० मीटर पोहोच रस्ते प्रस्तावित आहेत. हा पूल झाल्यानंतर आपटी, वाकी, तेटली, बामणोली आदी गावांना फायदा होणार असून, २५ किलोमीटर अंतराचा प्रवास वाचणार आहे. या दोन्ही पुलांच्या उभारणीमुळे या भागातील पर्यटन वाढीस चालना मिळेल, या भागातील रोजगार आणि व्यापार वृद्धी होईल. पर्यटकांनाही बामणोलीतून थेट कोकणात उतरता येणार आहे. महाबळेश्वर ते बामणोली असाही प्रवास कमी वेळेत करता येणार असल्याने या दोन्ही पुलांचा फायदा स्थानिकांसह पर्यटकांना होईल, असा विश्वास आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटनShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले