शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
2
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
3
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
4
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
5
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
6
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
7
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
8
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
9
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
10
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
11
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
12
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
13
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
14
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
15
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
16
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
17
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
18
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
19
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
20
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं

Satara- पुसेसावळीतील दंगल: दोन गुन्हे दाखल; २३ जण ताब्यात

By दीपक शिंदे | Published: September 11, 2023 7:28 PM

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विशेष पोलिस महानिरीक्षकांचे आवाहन

सातारा : पुसेसावळी, ता. खटाव येथील घटनेच्या अनुषंगाने औंध पोलिस ठाणे येथे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्याच्या तपासादरम्यान आतापर्यंत सुमारे २३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे कोल्हापूर परिसराचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवार, दि. १० सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर एका समूहाच्या दोन मुलांच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही मुलांना चौकशी कमी बोलवून विचारपूस करण्यात येत असताना यादरम्यान, आक्षेपार्ह कमेंटला दुसऱ्या समूहाच्या युवकांकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आली. रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास दुसऱ्या समूहाच्या विचारसरणीच्या सुमारे शंभर ते दीडशे युवकांनी एकत्र जमून अचानकपणे दुचाकी व चारचाकी वाहने पेटवून दिली. पहिल्या समूहातील युवकांना मारहाण करून सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करत असताना पोलिसांनी योग्य त्या बळाचा वापर करून जमावास पांगवण्यात यश मिळविले. या मारहाणीमध्ये एकूण दहा व्यक्ती जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या सर्वांची प्रकृती चांगली आहे. तसेच या घटनेमध्ये एक व्यक्ती उपचारदरम्यान मृत झाली आहे.पुसेसावळी, ता. खटाव येथील घटनेच्या अनुषंगाने औंध पोलिस ठाणे येथे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, आक्षेपार्ह मजकुराच्या गुन्ह्याचा तपास औंधध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक वाळवेकर हे करीत आहेत तर या घटनेतील खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा हे करीत आहेत.

सामाजिक सलोखा व शांतता राखावी..पुसेसावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर कोणतीही चुकीची पोस्ट न करता सामाजिक सलोखा व शांतता राखावी आणि पोलिस व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया