शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

काशीळ, शाहूपुरीतील दोन डॉक्टर जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:02 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककाशीळ : काशीळ (ता.सातारा) येथील डॉ. सिकंदर आदम शेख याच्यासह शाहूपुरी सातारा येथील डॉ. अशोक गुंडू पाटील हे दोघे पुन्हा एकदा गर्भलिंग निदान कायद्यान्वये शाहूपुरी आणि बोरगाव पोलिसांच्या जाळ्यात सापडले. दरम्यान, या दोन्ही डॉक्टरांविरोधात यापूवीर्ही सातारा शहर, बोरगाव व उंब्रज पोलीस ठाण्यात या गर्भलिंग निदान चाचणीचे गुन्हे दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्ककाशीळ : काशीळ (ता.सातारा) येथील डॉ. सिकंदर आदम शेख याच्यासह शाहूपुरी सातारा येथील डॉ. अशोक गुंडू पाटील हे दोघे पुन्हा एकदा गर्भलिंग निदान कायद्यान्वये शाहूपुरी आणि बोरगाव पोलिसांच्या जाळ्यात सापडले. दरम्यान, या दोन्ही डॉक्टरांविरोधात यापूवीर्ही सातारा शहर, बोरगाव व उंब्रज पोलीस ठाण्यात या गर्भलिंग निदान चाचणीचे गुन्हे दाखल आहेत.याबाबत पोलिसांकडून व राष्ट्रीय महिला आयोग सदस्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार,काही दिवसांपूर्वी वाई येथील एका दाम्पत्याने अनधिकृतरीत्या गर्भलिंग तपासणी करून अकलूज (सोलापूर) येथे गर्भपात केल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांच्या सहकाºयाने संबंधित दाम्पत्य शोधून काढून त्यांनी हे प्रकरण बाहेर काढले होते. या संदर्भात अधिक माहिती घेतल्यानंतर या रॅकेटचे पाळे-मुळे शाहूपुरी, काशीळ व अकलूज असल्याचे समोर आले.यापूवीर्ही डॉ. सिकंदर शेख याच्या विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात जुलै २०१२ मध्ये गर्भलिंग निदान केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, शेख हा जामिनावर सुटला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर त्याच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असून, त्याप्रकरणी उंब्रज पोलिसांना तो हवा असल्याचे समजते. या घटनेतील दुसरा डॉक्टर अशोक पाटील याच्याही विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गर्भलिंग निदान चाचणीचा गुन्हा दाखल आहे.दरम्यान, बुधवारी एका अंगणवाडी सेविकेला शाहूपुरी येथील डॉ.अशोक पाटील याच्याकडे पाठविण्यात आले. तेथे गर्भ लिंगनिदान तपासणीसाठी त्यांना पंधरा हजार रुपये मागण्यात आले. या ठिकाणी सापळा यशस्वी झाल्यानंतर संबंधित दाम्पत्याला दुपारी काशीळ येथील डॉ. सिकंदर शेख याच्याकडे पाठविण्यात आले. हे दोन्ही डॉक्टर गर्भलिंग निदान करताना सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. डॉक्टरांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईवेळी जिल्हा शल्यचिकित्सकडॉ. श्रीकांत भोई, अ‍ॅड. वर्षा देशपांडे व तसेच शाहूपुरी आणि बोरगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी स्वत: हजर होते. सिकंदर शेख यांच्या राहत्या घरात संबंधित महिलेची गर्भलिंग चाचणी केल्यानंतर या टीमने त्याला व डॉ. अशोक पाटील या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी डॉ. अशोक पाटील याची चारचाकी गाडीही ताब्यात घेतली आहे.दरम्यान, या दोन्ही घटनांची रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम बोरगाव पोलिस ठाण्यात सुरू होते. या सर्व घटनेत राष्ट्रीय महिला आयोग सदस्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, आरोग्य विभागाच्या लीगल अ‍ॅडव्हायजर अ‍ॅड. पूनम साळुंखे, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. एम. धुमाळ, पोलिस निरीक्षक सी. एस. बेदरे, कर्मचारी बालम मुल्ला, धनंजय कुंभार, स्वप्नील कुंभार, महिला पोलिस प्रीती माने, भोसले, चालक गिरीश रेड्डी तसेच बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी, जवान किरण निकम, राजू शिखरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.