शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

दोन बोकडांंनी वाचविला मुलांचा जीव

By admin | Published: June 12, 2015 11:38 PM

सदर बझार येथील घटना : डबक्यात विद्युत पुरवठा; जनावरांच्या मृत्यूनंतर परिसरात सतर्कता

सातारा : सदर बझार येथील दर्गाह कालव्याजवळ पावसाचे पाणी साचून तयार झालेल्या डबक्यात करंट लागल्याने एका बोकडाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, याच बोकडाच्या मागे काही मुले चालत घराकडे निघाली होती. बोकडाला शॉक लागल्याने सर्व मुले पुढे निघून न जाता जागीच थांबली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर डबक्यात विद्युतपुरवठा करणारी एक वायर तुटून पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याठिकाणचा विद्युतपुरवठा बंद केला.सदर बझार येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे काम एका कंपनीमार्फत सुरू आहे. या कामासाठी राज्याबाहेरील कामगार मोठे संख्येने सदर बझारमध्ये आले आहेत. या सर्व कामगारांची राहण्याची व्यवस्था येथील जवान हौसिंग सोसायटी जवळ करण्यात आली आहे. कामगारांच्या जवळपास ३० ते ४० घरांना ठेकेदाराने कंपनी कार्यालयापासून ४० मीटर दूर भूमिगत केबल टाकून विजेची सोय केली आहे. गेल्या वर्षापासून ही केबल रस्त्याकडेला टाकण्यात आली आहे. ऊन व पावसामुळे ही केबल खराब होऊन यातील तारा उघड्यावर पडल्या आहेत. शहरात गुरुवारी झालेल्या पावसामुळे ही केबल जमिनीबाहेर आली. ज्या ठिकाणी ही केबल जमिनीबाहेर आली त्याठिकाणी पाण्याचे एक डबके तयार झाले. केबलमुळे या डबक्यात वीजपुरवठा सुरू होता. दरम्यान, सायंकाळीच्या सुमारास दोन बोकड अचानक या डबक्याकडे आल्या. यावेळी वीजपुरवठा सुरू असल्याने दोन्ही बोकडांना विजेचा धक्का बसल्याने एका बोकडाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी बोकड सुमारे पन्नास फूट लांब अंतरावर उडून पडली. जखम झाल्याने काही वेळांनंतर दुुसऱ्याही बोकडाचा मृत्यू झाला. या बोकडांपाठोपाठ १३ ते १४ वर्षांची मुले पावसाचा आनंद लुटत घराकडे निघाली होती. डबक्यातील मृत बोकडाची अवस्था पाहून सर्व मुले डबक्यापासून अवघ्या चार फूट अंतरावरच थांबली होती. त्यांना पुढील धोक्याबाबत कसलीच कल्पना नव्हती. दरम्यान, हा सर्व प्रकार पाहून येथील रहिवासी दत्तात्रय शिंदे, बाबासाहेब शेलार, सुजीत जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणीनंतर बोकडाचा डबक्यात सुरू असलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे शॉक लागून मृत्यू झाल्याचे समजताच त्यांनी तत्काळ विद्युतपुरवठा बंद केला. (प्रतिनिधी)सदर बझार येथे झालेल्या या घटनेनंतर नागरिकांनी महावितरण कंपनीला याची माहिती दिली. यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मात्र, हे काम खासगी असल्याने संबंधितांना सुरक्षेबाबत योग्य त्या सूचना केल्या जातील असे, आश्वासन देऊन कर्मचारी निघून गेले.- दत्तात्रय शिंदे, नागरिकचिकटपट्टीने केली मलमपट्टी... संबंधित ठेकेदाराने जमिनीतून विद्युतपुरवठा करण्यासाठी वापरलेली केबल कमी प्रतीची आहे. या प्रकाराबाबत माहिती मिळाल्यानंतरही त्याने विद्युतपुरवठा करणाऱ्या केबलला फक्त चिकटपट्टी लावून पुन्हा वीजपुरवठा सुरू ठेवला आहे. यामुळे जीवितास धोका निर्माण झाला असून, याठिकाणचा विद्युतपुरवठा बंद करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.