विजेच्या धक्क्याने दोन ठार
By admin | Published: May 08, 2016 12:22 AM
महाबळेश्वरमधील घटना : चिक्की कारखान्याच्या मालकासह कामगाराचा समावेश
परिविक्षाधिन युवा जिल्हाधिकार्यांंनी केले युवकांचे कौतुक....धरणगाव- तालुक्यातील भोणे येथील युवा कार्यकर्त्यांनी कयनी नदीचे खोलीकरण-रुंदीकरणाचे हाती घेतलेले काम कौतुकास्पद असून त्यांनी केलेले काम पंचक्रोशीला प्रेरणादायी असल्याचे मत धरणगावचे परिविक्षाधिन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले.भोणे, ता.धरणगाव येथे रा.स्व.संघाच्या ग्रामसमितीच्या माध्यमातून कयनी नदी पुर्नज्जीवन लोकसहभागातून व लोकवर्गणीतून होत आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी व युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी युवा प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अमोल येडगे, तहसीलदार शशिकांत खैरनार यांनी भोणे येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळीश्रमदान करणार्या ग्रामविकास समितचे विभाग प्रमुख शांताराम शिंदे, जिल्हा सदस्य चिंतामण पाटील, भोणे समितीचे प्रमुख संजय पाटील, व्यवस्थापक अरुण पाटील, शिवाजी पाटील, तुषार पाटील, योगेश पाटील, सखाराम पाटील, संजय गोपीचंद पाटील, सरपंच बाळू पाटील, कृउबा संचालक दिनेश पाटील, नंदू काटोले, दिलीप पाटील, मंदार चौधरी, चेतन चौधरी यांच्यासह ग्रामस्थ, ज्येष्ठ मंडळी यांच्याशी चर्चा केली. भविष्यातील त्यांच्या संकल्पना समजावून घेतल्या. आभार चिंतामण पाटील यांनी मानले. (वार्ताहर)कॅप्शन - भोणे, ता.धरणगाव येथील लोकसहभागातून होत असलेल्या नदी खोलीकरण कामाची पाहणी करून चर्चा करताना परिविक्षाधिन जिल्हाधिकारी अमोल येडगे, तहसीलदार शशिकांत खैरनार व सर्व पदाधिकारी.