शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"भाजपने डॉग स्कॉड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
8
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
9
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
10
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
11
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
12
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
13
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
14
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
15
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
16
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
17
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
18
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
19
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
20
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."

दोन महिन्यांनीही सत्तर विहिरी तुडुंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 11:04 PM

सचिन मंगरूळे ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हसवड : पाचवीला पुजलेल्या दुष्काळाचा शिक्का पुसण्यासाठी माण तालुक्यातील कारखेल ग्रामस्थांनी यंदा चांगलीच कंबर कसली. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांनी ४५ दिवस श्रमदान करुन जलसंधारणाची कामे उभारली. या हंगामात एक दिवसच गावात पाऊस झाला. पण या पावसाने परिसरातील सत्तरहून अधिक विहिरी तुडुंब भरल्या. पन्नास दिवसानंतरही ...

सचिन मंगरूळे ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हसवड : पाचवीला पुजलेल्या दुष्काळाचा शिक्का पुसण्यासाठी माण तालुक्यातील कारखेल ग्रामस्थांनी यंदा चांगलीच कंबर कसली. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांनी ४५ दिवस श्रमदान करुन जलसंधारणाची कामे उभारली. या हंगामात एक दिवसच गावात पाऊस झाला. पण या पावसाने परिसरातील सत्तरहून अधिक विहिरी तुडुंब भरल्या. पन्नास दिवसानंतरही त्या विहिरी भरलेल्या आहेत.कारखेल ग्रामस्थांनी उभारलेल्या जलसंधारण कामातून व त्याला मिळालेल्या निसर्गाच्या साथीतून चांगले चित्र दिसत आहे. पाणी फाउंडेशनमध्ये सहभागी होत ग्रामस्थांनी ४५ दिवस श्रमदान केले. त्यानंतर एकच पाऊस झाला त्यामुळे ४५ दिवसांच्या श्रमाची आणि एक दिवसाच्या पावसाच्या कमालीचे यश कारखेल ग्रामस्थ अनुभवत आहेत.म्हसवडच्या उत्तरेला सोलापूर जिल्ह्यााच्या सीमेवर डोंगराच्या कुशीत १, ५७७ लोकसंख्येचं कारखेल गांव वसलेले आहे. कायम दुष्काळी परिस्थितीशी झगडत अनेक पिढ्या संपल्या तरी येथील दुष्काळ संपलानाही. ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ सुरू झाली. गावाने स्पर्धेत सहभागी होत श्रमदानाला सुरुवात केली. ८ एप्रिलला सुरू झालेलं श्रमदान २२ मेपर्यंत सुरू होतं. सलग ४५ दिवस श्रमदानाच काम करून या लोकांनी गावासाठी एक आगळावेगळा इतिहास रचला. मायभूमीचे ऋण फेडण्यासाठी आणि तिला सुजलाम् सुफलाम् बनविण्यासाठी गाव एकवटला, आणि एक वेगळच तुफान आलं.घराघरात फक्त पाणी फाउंडेशनच्या गोष्टी होऊ लागल्या. लोकं पाण्याबाबत जागृत झाली आणि एकमेकांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले. इतर ठिकाणी स्थायिक झालेली सगळी लोकं गावासाठी पुन्हा एकत्र आली.पाण्यासाठी सुरू केलेल्या लढ्यात तेवढ्याच तळमळीने सहभागी झाली. पन्नास दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने डोंगरावरून येणाºया पाण्याची धार सुरूच असल्याने गावातील पाझर तलाव, सत्तर विहिरींमध्ये तुडुंब पाणी आहे.केवळ २२ टक्केच कामस्पर्धेदरम्यान अनेक मान्यवरांनी याठिकाणी भेट देऊन प्रोत्साहन दिलं. यातूनच ४५ दिवस न थकता काम करण्याचं बळ मिळालं. आणि ते कामही तेवढ्याच उत्साहात पूर्ण झालं. हे काम झाले असले तरी गावच्या एकूण क्षेत्रातील २२ टक्के च काम झाले. उर्वरीत भागातील मृदसंधारण व जलसंधारणाचे काम झाल्यास येथील सतत पडणाºया दुष्काळावर मात करता येणार आहे.श्रमदानालामान्यवरांची जोडकोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या प्रयत्नातून सीएसआर फंडातून सहा लाख रुपये, राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांनी आठ दिवस डिझेलसहीत पोकलेन मशीन दिले. पुणे येथील जैन संघटनेने २८० तास जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले. बबन विरकर यांनी दोन बॅरल डिझेल दिले, माळशिरस तालुका कृषी अधिकाºयांनी एक बॅलर डिझेल तर गावातील तीन दानशूर व्यक्तिंनी २७ हजारांची मदत केली. वॉटर कप स्पर्धेत तलाठी यु. व्ही. परदेशी, बी. एम. बोराटे यांनी ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून श्रमदान केले.खूप काही कामं२४ नालाबांध१७ जुन्या नालाबांधची दुरुस्ती२ तलावांची गळती काढली१७ किलोमीटर डीपसीसीटी२० लुज बोल्डर१६५ हेक्टरवर कंपाटमेंट बंडींगप्रत्येक कुटुंबाला पाच झाडे यामध्ये आंबा, सिताफळ, जांभूळ, कवट या फळांची झाडे देऊन ती जगवण्यासाठीची हमी घेतली.विद्यार्थ्यांना एक झाड दिले तसेच गावात येणाºया रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणही केले.