सातारा : जिल्ह्यात अधून-मधून कोरोनामुळे मृत्यू होत असून, गुरुवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ८५९ वर पोहोचली आहे. तसेच बाधितांचा आकडा ५९ हजार २६८ इतका झाला आहे.जिल्ह्यात बुधवारी रात्री ९६ जणांचे अहवाल बाधित आले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दिडवाघवाडी, ता. सातारा येथील ५० वर्षीय महिला, दहिवडी तालुका मान येथील ७४ वर्षीय वृद्धेचा समावेश आहे.जिल्ह्यातील पाटण, फलटण, खटाव, माण, कोरेगाव, खंडाळा आणि वाई या सात तालुक्यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, ही संख्या आठ ते १५ अशी आहे.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोना मुक्तीचेही प्रमाण चांगले असून, आत्तापर्यंत ५५ हजार ९०९ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच सध्या १५०० कोरोना बाधित रुग्णावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.