शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

जिल्ह्यात दोन हजार उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Published: October 30, 2016 12:33 AM

शेवटच्या दिवशी झुंबड : नगरपालिकांसाठी १२६०, तर नगरपंचायतींसाठी ७४६ अर्ज

सातारा : जिल्ह्यातील आठ नगरपालिकांमध्ये एकूण १८२ जागांसाठी १२६०, तर सहा नगरपंचायतींच्या १०२ जागांसाठी ७४६ एवढे अर्ज शेवटच्या दिवसांपर्यंत दाखल झाले आहेत. सातारा पालिकेसाठी २५३ अर्ज दाखल झाले असून, याठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. कऱ्हाड पालिकेसाठी २४१ अर्ज दाखल झाले आहेत, तर फलटण पालिकेतही तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि सहा नगरपंचायतींची निवडणूक सुरू आहे. शनिवार हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. म्हसवड पालिका निवडणुकीत रंगत येणार असून, नगरसेवकांच्या १७ जागांसाठी १११, तर नगराध्यक्षपदासाठी विक्रमी असे २४ अर्ज दाखल झाले आहेत. रहिमतपूरला १७ जागांसाठी ५९ अर्ज दाखल झाले आहेत. महाबळेश्वरात १७ जागांसाठी ९२ उमेदवारांचे १२० अर्ज दाखल झाले आहेत. वाईमध्ये २० जागांसाठी १२४ अर्ज दाखल आहेत. जिल्ह्यात कोरेगाव, खंडाळा, वडूज, दहिवडी, पाटण आणि मेढा नगरपंचायतींसाठी पहिल्यांदाच मतदान होत आहे. या निवडणुकीत मोठी चुरस असल्याचे दिसत आहे. कोरेगावमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसेही रिंगणात उतरली आहे. दहिवडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना-भाजप निवडणूक लढवित आहेत. दहिवडीत १७ जागांसाठी ११५ अर्ज दाखल झाले आहेत. वडूजला १७ जागांसाठी तब्बल २०८ अर्ज दाखल आहेत. पाटणला १७ जागांसाठी १४९ अर्ज तर मेढ्यात १७ जागांसाठी ६८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी) दाखल झालेलेउमेदवारी अर्ज असेपालिका जागाअर्जसातारा ४०२५३कऱ्हाड २९२४१फलटण२५२०१वाई२०१२४रहिमतपूर१७५९महाबळेश्वर१७१२०पाचगणी १७१५१म्हसवड १७१११नगराध्यक्षपदासाठी १०३ अर्जथेट नगराध्यक्ष निवडणूक होत असल्याने नगराध्यक्षपदासाठीही जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी १०३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे, ते असे...नगर पंचायतजागाअर्जकोरेगाव१७१०२खंडाळा१७१०४वडूज१७२०८दहिवडी१७११५मेढा१७६८पाटण१७१४९उदयनराजे उवाच पालिकेत ४०-० केलं नाही तर खासदारकीचा राजीनामा देईन. मी आडमुठेपणा केला असता तर मी २२ महिने जेलमध्ये नसतो. मला त्यावेळी कोणी जेलमध्ये घातलं, हे सगळ्यांना माहीत आहे.त्यांच्या सगळ्या मतांची बेरीज पण माझ्याएवढी होणार नाही. माझे काका शिवाजीराजे त्यांच्यासोबत आहेत. त्यांना डावलून मी फॉर्म भरायला आलो नसतो; पण तत्त्वं महत्त्वाची. शिवेंद्रसिंहराजे उवाच जिल्हा बँक निवडणूक झाली तेव्हापासूनच उदयनराजेंच्या डोक्यात मनोमिलन तोडायचं होतं.मराठ्यांचे हे मूळ घर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने दुभंगलंय, याची खंत माझ्या मनामध्ये कायम राहील.आमदार म्हणून तुम्ही काय केलं, असं त्यांनी विचारणं चुकीचं आहे, असं मला वाटतं.आम्ही खासदारकीला प्रचार केलेला चालतो. जिल्हा बँकेला आम्ही तुम्हाला मदत केलेली चालते. बाकी मात्र तुम्हाला आमचं काहीच चालत नाही, याला काय अर्थ ?