शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

दुचाकी-ट्रक धडकेत दोन ठार

By admin | Published: October 25, 2015 12:32 AM

म्हसवडजवळ अपघात : दुचाकीस्वार वीस फुटांवर फेकला गेला

म्हसवड : येथील पंढरपूर-सातारा रस्त्यावरील पंतवस्तीजवळ दुचाकी आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील हणमंत लक्ष्मण गळवे (वय २७, रा. गळवेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) व धनंजय शामराव कर्चे (रा. आटफाडा, ता. बारामती) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले. पोलिसांच्या माहितीनुसार, हणमंत गळवे व धनंजय कर्चे हे दोघे मेहुणे दुचाकीवरून (एमएच ४२ एडी ८०९७) साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. ते येथील पंतवस्तीजवळ आले असता पंढरपूरच्या दिशेने भरधाव निघालेल्या ट्रकची (एमएच १३ एक्स ४४५६) दुचाकीला जोरदार धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वार हणमंत गळवे यांचा जागीच मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेले धनंजय कर्चे हे सुमारे वीस फुटांवर फेकले गेले. यामध्ये त्यांचाही जागीच मृत्यू झाला. शेतात काम करणाऱ्या महिलांनी आरडाओरडा केल्याने चालकाने ट्रक जाग्यावरच सोडून पलायन केले. त्यावेळी माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी, दुर्गेश शिंदे, रोहित सूर्यवंशी, पप्पू लोखंडे, पाडुरंग पवार, पांडुरंग सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून घटनेची माहिती देत मृतदेह म्हसवड आरोग्य केंद्रात नेण्यास मदत केली. अपघाताची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात झाली आहे. (प्रतिनिधी)