सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील एका बागेत झालेल्या कार्यक्रमात ‘तेरे बिना जिया जाए ना...’ हे गीत गायलं, आता ते राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांसाठी होतं की खा. शरद पवारांवरच्या पे्रमापोटी? याबाबत जोरदार चर्चा सातारा शहरात सुरू झाली आहे.
सदर बझार येथील श्री. छ. सुमित्राराजे उद्यान नूतनीकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्षा माधवी कदम, नगरसेवक निशांत पाटील, कºहाडचे राजेंद्र यादव, प्रा. रमणलाल शहा, रजनी जेधे यांची उपस्थिती होती.उदयनराजेंनी या कार्यक्रमात गाणे गायल्यानंतर ‘कोणी याला नौटंकी म्हणो, मला काय देणं-घेणं नाय,’ असं म्हणत कॉलर उडवली. तसेच ‘स्टाईल इज स्टाईल,’ असे उद्गार काढत उपस्थितांकडून टाळ्या-शिट्ट्या मिळविल्या.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीकडे मागणी केली आहे. त्यांना पक्षांतर्गत विरोध आहे, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही कुठलेही ठाम आश्वासन त्यांना दिलेले नाही. आता पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटातून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे नाव पुढे केले जात आहे. या परिस्थितीला अनुरुप उदयनराजेंनी हे गाणे म्हटल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.सातारा येथील सदर बझार परिसरात श्री. छ. सुमित्राराजे उद्यानात आयोजित कार्यक्रमात खा. उदयनराजे भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.