शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
2
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
3
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
4
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
5
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
6
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
7
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
8
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
9
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
10
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
11
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
12
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
13
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
14
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
15
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
16
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
17
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
18
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
19
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी

उदयनराजे तुम्हीच टीमचे मालक; कोणाला ठेवायचं कोणाला नाही ठरवा, पण..; देवेंद्र फडणवीसांची मिश्कील टिप्पणी

By प्रमोद सुकरे | Published: January 17, 2024 4:28 PM

मुंबईत अनेक रेडे मोकाट

कराड: उदयनराजे तुम्हीच आयपीएल टीमचे मालक आहात. त्यामुळे टीम मध्ये कोणाला ठेवायचं कोणाला ठेवायचं नाही हे तुम्हीच ठरवा अशी फटकेबाजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराडात केली. उपस्थितांनी ही त्याला चांगलीच दाद दिली. पण सातारच्या लोकसभेच्या मैदानात उदयनराजेच पुन्हा याचीही चर्चा सभास्थळी सुरु झाली.

कराड येथे दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या कृष्णा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले होते .भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माथाडीचे नेते नरेंद्र पाटील, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, विनायक भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, रामकृष्ण वेताळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात बोलताना डॉ. अतुल भोसले यांनी कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा नव्याने आराखडा करण्याची मागणी केली. या मागणीला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंनीही दुजोरा दिला. रणजीचे सामने व्हावेत असे स्टेडियम बनवा असे ते फडणवीस यांना म्हणाले. तर व्यासपीठावर रणजीत खेळण्यासारखे अनेक खेळाडू आहेत. पण मलाही तेवढे त्या टीम मध्ये ठेवा असे मिश्कीलपणे त्यांनी टिप्पणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर उदयनराजे ही रणजीची नव्हे तर आयपीएलची टीम आहे. या टीमचे मालक तुम्ही आहात. आणि टीम मध्ये कोणाला ठेवायचं? कोणाला ठेवायचं नाही हे तुम्हीच ठरवायचं आहे असं म्हणताच टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी त्याला  प्रतिसाद दिला. यावेळी लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसलेच पुन्हा उमेदवार असल्याची चर्चा  उपस्थितांच्यात रंगून गेली.

मुंबईत अनेक रेडे मोकाटदेवेंद्र फडणीस आपल्या भाषणात म्हणाले, कृषी क्षेत्राला विज्ञानाची जोड देणारे हे प्रदर्शन आहे .येथे देश विदेशातील तज्ञ आले आहेत. त्यांचे परिसंवाद होणार आहेत. तसेच देशातील सर्वात मोठा बैल इथं आला आहे. आणि त्याबरोबर यांत्रिक बैलही आले आहेत. पण आमच्याकडे मुंबईत रेडे मोकाट झाले आहेत. मीडियासमोर दररोज येऊन काहीही बोलत राहतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तुमच्याकडे काही तंत्रज्ञान असेल तर आम्हाला सांगा असा नाव न घेता त्यांनी खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. आणि उपस्थितांच्यात  एकच हशा पिकला.आघाडी नव्हे महायुतीचउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले आत्ताच बोलताना त्यांच्या तोंडातून चुकून महाविकास आघाडी हा शब्दप्रयोग झाला. माध्यमांची लोक बरोबर त्यावरच बोट ठेवतील, असे म्हणत आमची महायुतीच आहे असे सांगताच उपस्थितांनी त्यालाही दाद दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस