सातारा: साताºयात आल्यावर राजेंचे नाव घेतले नाही तर आम्हाला साताºयातून बाहेर पडता येणार नाही, या शब्दात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी साताºयात उदयनराजेंसमोरच चौफेर फटकेबाजी केली. विशेष म्हणजे महाजन यांनी यावेळी मी बोलायला उठलो तेव्हापासून उदयनराजे माझ्याकडे तिरप्या नजरेने बघत आहेत, असे सांगत राजेंची फिरकी घेतली.भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जलसंपदा विभागातर्फे सातारा येथे आयोजित केलेल्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात महाजन बोलत होते.यावेळी महाजन यांनी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे आणि शंभूराजे यांचे नाव घेतल्याशिवाय भाषण करताच येणार नाही, असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री गडकरी यांनीही त्यांना हसून दाद दिली.
उदयनराजेंचे नाव घेतले नाही तर साताऱ्यातून बाहेर पडता येणार नाही; महाजनांची फटकेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 9:33 PM