सातारा - जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरुन खासदार उदयनराजे भोसले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. सत्ताधाऱ्यांना टार्गेट करताना मी जे काही करतोय ते शेतकरी आणि सभासदांसाठीच करतोय, असे म्हणत उदनयनराजेंनी हात जोडून विनंती करत असल्याचं म्हटलं. एकवेळ माझी जिरवायचीय तर जीरवा, पण सभासदांची जीरवू नका, ही बँक शेतकऱ्यांची अन् सभासदांची आहे, असेही उदयनराजेंनी म्हटलं.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जवाटपाप्रकरणी बँकेला ईडीने नोटीस धाडली आहे. या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी बँकेकडे माहिती मागितली होती. मात्र, बँकेच्या संचालकांनी ही माहिती उदयनराजेंना देण्यास देण्यास नकार दिला. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले भडकले आणि त्यांनी ही बँक बँकच राहूद्या, गोरगरिबांची ती अर्थवाहिनी आहे, असे म्हणत सत्ताधारी पॅनेलवर चांगलाच प्रहार केला.
बँक टिकवली, टिकून राहवी म्हणून मला राहवं लागणार. इकडच्य लोकांना तुम्ही बोलून घ्या, जिरवू... माझी नका जीरवू. मेहरबानी करा, मी तुमचा कोणाचा दुश्मन नाही. मी हात जोडून विनंती करतो, ही बँक शेतकरी अन् सभासदांची आहे, त्या बिचाऱ्या शेतकरी वर्गाच्या गोरगरीब सभासदांच्यावतीने विनंती करतो, ती बँक राहू द्या, संपूर्ण अर्थवाहिनी आहे. माझी जीरवायची असेल तर जीरवा, पण सभासदांची जिरवू नका.
माझा काय स्वार्थ
मी जे करतोय त्याला तुम्ही म्हणता तडजोड करतोय, त्यात माझा काय स्वार्थ आहे. कुठं जायचं ते मी ठरवतो, पॅनलमध्ये घेणार सांगणारे हे कोण. परिणामाला मी घाबरत नसतो, मी कोणाच्या विरोधात बोलत नाही, संबंधितांनी समजून घ्यावं, बोध घ्यावा, मी केवळ शेतकऱ्यांच्या हिताचं बोलतोय, असे उदयनराजे यांनी म्हटलंय.