शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

तिरकी चाल खेळत उदयनराजेंचा ‘चेक मेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:57 PM

सातारा : राजकारणात आपल्या विरोधकांना नेहमीच ‘चेक मेट’ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी बुद्धिबळातही आपल्या हुशार खेळीचे चातुर्य दाखविले आहे. सारीपाटावर आपल्याला कोंडीत पकडणाºया बुद्धिबळ प्रशिक्षकाला वजिराच्या एकाच चालीत त्यांनी पराभूत केले.आॅल इंडिया चेस असोसिएशनच्या मान्यतेने व सातारा पालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘खासदार चषक राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे’ उद्घाटन ...

सातारा : राजकारणात आपल्या विरोधकांना नेहमीच ‘चेक मेट’ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी बुद्धिबळातही आपल्या हुशार खेळीचे चातुर्य दाखविले आहे. सारीपाटावर आपल्याला कोंडीत पकडणाºया बुद्धिबळ प्रशिक्षकाला वजिराच्या एकाच चालीत त्यांनी पराभूत केले.आॅल इंडिया चेस असोसिएशनच्या मान्यतेने व सातारा पालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘खासदार चषक राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे’ उद्घाटन खासदार उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यानंतर खासदार उदयनराजे व बुद्धिबळ प्रशिक्षक जयंत उथळे यांच्यात सलामीचा सामना झाला. उथळे यांचा अनुभव दांडगा असल्यामुळे ते सुरुवातीला आक्रमक चाली खेळत होते. उदयनराजेंच्या प्याद्यांना अडकविण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू होता. मात्र, सुरुवातीला बचावात्मक पवित्रा घेतल्याचे दाखवत दुसºया बाजूने उदयनराजेंची आक्रमक खेळी केली. त्यांनी आडव्या-तिडव्या चालींच्या उंट अन् घोड्याचा पुरेपूर वापर करत स्पर्धकाच्या प्याद्यांची दाणादाण उडवली. शेवट्याच्या टप्प्यात आपल्या वजिराला हात घालत त्यांनी उथळे यांच्या राजाला चेक मेट दिला आणि इथेच खेळ संपला अन् उदयनराजे जिंकले.यावेळी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, सुजाता राजेमहाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिवाजी उदय मंडळाच्या हॉलमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पाच दिवस चालणार आहे.जिंकण्याचीच इर्ष्या बाळगा...‘बुद्धिबळ म्हटलं की कोणाचा तरी विजय अन् कोणाचा तरी पराभव होणार, हे निश्चित आहे. मात्र, पराभवाचे वाईट वाटून घेऊ नये. उलट ज्यांनी मला आता हरवलं आहे, त्याला पुढच्या वेळी मी हरवणारंच, अशी इर्ष्या मनात बाळगली पाहिजे,’ असेही यावेळी उदयनराजे म्हणाले.पुढील वर्षी भव्य स्पर्धा‘बुद्धिबळ हा खेळ म्हणावा इतका सोपा नाही. या खेळात एकाग्रता अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्यावर कशाप्रकारे घातपात होऊ शकतो, आपण कोणाला जवळ केलं पाहिजे आणि कोणाला दूर केलं पाहिजे, अशा अनेक गोष्टी या खेळातून शिकायला मिळतात. पुढच्या वेळी याही पेक्षा भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन केले जाईल, असे सांगून खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.