कºहाड (जि. सातारा) : ‘उद्धव ठाकरे अयोध्येला गेले, ही आनंदाची बाब आहे. राम मंदिर व्हावे ही तर तमाम हिंदूंची इच्छा आहे. त्यामुळे उद्धवजींना प्रभू रामांचे आशीर्वाद लाभू देत’, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.कºहाड येथे रविवारी महाराष्टÑाचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस कºहाडला आले होते. स्मृतिस्थळाला अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आदींची उपस्थिती होती.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला गेले आहेत. राम मंदिर उभारणीची तारीख सांगा म्हणताहेत याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ‘दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पाया घातला आहे. हे राज्य उभारण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. म्हणून तर आमच्यासारखी मंडळी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने येथे नतमस्तक व्हायला आवर्जून येतात’, असेही फडणवीस म्हणाले.